पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Mallikarjun mahadev nhavre tal shirur श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर

इमेज
श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर   सौराष्ट्र सोमनाथ ,श्री         शैले   मल्लिकार्जुनम !!   मल्लिकार्जुन महादेव हे बारा ज्योतिर्लिंग मधील दुसरे ज्योतिर्लिंग   श्री शैल्यम चा मल्लिकार्जुन महादेव म्हणून भारतभर प्रसिध्द आहे.... महादेवाचे दुसरे नाव मल्लिकार्जुन आहे... अशा मल्लिकार्जुन महादेवाच्या नावाने आनेक मंदिर महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. असच एक मल्लिकार्जुन महादेवा च मंदिर शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात आहे.  न्हावरे गावाचा महादेव म्हणजे जागृत देवस्थान . या मल्लिकार्जुन महादेवाच मंदिर हे भव्यदिव्य असून मुळ बांधणी चालुक्यशैलीतील असून वेळोवेळी त्याचा जिर्णोद्धार झालेला आहे. मंदिराच्या दरवाजावर असलेल्या शिलालेखा नुसार जोशीपारखी यांनी याचा जिर्णोद्धार केलेला समजतो. पुढे पेशवेकाळात या मंदिराच्या देवस्थानाला रिसबुड घराण्याकडून दिवाबत्ती साठी खुपसारी जमिन दान दिली होती....  रिसबुड हे सावकरी करीत होते. करडे महालाची व्यवस्थाही हे पेशवेकाळात पाहात होते... मल्लिकार्जुन च्या कावडीचा इतिहास पाहता ही कावड पाच वेळा निघते. 1) चैत्र पाडवा - आलेगाव भीमा नदी २) चैत्र एकादश

Dwarkadhish temple pandharpur shinde द्वारकाधीश मंदिर पंढरपूर ग्वाल्हेरच्या शिंदे सिंधिया घराण्या चे

इमेज
  द्वारकाधीश मंदिर पंढरपूर ग्वाल्हेर च्या शिंदे सिंधिया घराण्याचे

bhalvani gadhi ashti beed भाळवणी ता आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी

इमेज
भाळवणी आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी   फलटणकर मुधोजी निंबाळकर यांचें जेष्ठ पुत्र राजे जगदेवराव यांचें वंशज राजे सुलतान राव राजे निंबाळकर यांची गढी तसेच महाराष्ट्राचे आदर्श माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री कै. श्री  विलासरावजी देशमुख यांच्या  मामाचा गढीचा वाडा‌‌ होय.... हा गढीचा वाडा खूपच मजबूत आणि सुंदर असून बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या गढीचा एक बुरुज जंग्या युक्त, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मजबूत असून खूपच सुंदर आहे. गढीला तीन प्रवेशद्वार असून खूपच मजबूत आणि सुंदर आहेत ‌. एका प्रवेशद्वाराला पुरातन आणि मजबूत असा लाकडी दरवाजा आहे ‌.  ◆ गढी मध्ये पाण्याचा आड  ( विहीर )... गढी मधे एक पाण्याचा आड ( विहीर) असून संपूर्ण विट बांधकाम असलेली माझ्या पाहाण्यात आलेली पहिली विहीर आहे.  गढीच्या आतील उघड खांबी माळवदाच्या बैठक व्यवस्थेच्या खांबाचे तळखडे खूपच सुंदर आणि नक्षीदार आहेत ‌.  या गढीस पुर्वी  खंदक होता असे सुलतानराव निंबाळकरांचे वंशज श्री अरुणराव निंबाळकर यांनी सांगितले आहे पण आता खंदक नामशेष झाला आहे.  या गढीच्या समोरच एक सुंदर अशी शिवपिंडी सारखी सुंदर बारव  आहे...  मित्र

बीड प्राचीन मंदिर खंडेश्वरी देवी आणि मेंढपाळ कथा

इमेज
बीड खंडेश्वरी देवी प्राचीन मंदिर मराठवाड्यातील बीड शहरात पूर्वेला टेकडीवर खंडोबा मंदिरापासून सुमारे एक किमी अंतरावर खंडेश्वरीचे प्राचीन देवालय उभे आहे.  असे म्हणतात की कालोजी नामक धनगराने हे मंदिर बांधले. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात खंडेश्वरी मातेची ख्याती असून नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. बीड शहरातील खंडोबा मंदिराच्या टेकडीच्या बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरी मातेचे प्राचीन देवालय आहे. मंदिर प्रकारात असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर खंडेश्वरीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे.  हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधले असे सांगितले जाते. खंडोबा मंदिराचे टेकडी पायथ्याचे स्थान व खंडेश्वरी नावावरून हे बाणाईचे स्थान असावे असे वाटते. या मंदिरा समोर काळोबा वीर धनगराची समाधी आहे. खंडेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात आख्यायिका सांगितली जाते. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुका मातेने वर माग म्हणून सांगितले, तेव्हा देवी तू म

छत्रपतींची श्रीराम भक्ती

इमेज
◆ छत्रपतींची श्रीराम भक्ती.... छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची प्रभू श्रीरामचंद्राप्रती अपार श्रद्धा होती. समकालीन साधनातील नोंदीनुसार छत्रपतीं शिवरायांनी रामायणाचा विद्याभ्यास केला व रामायणाचे श्रवण केले.  छत्रपती संभाजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांची स्तुती त्यांच्या बुधभूषण या ग्रंथात केली. चाफळ येथीळ रामनवमीच्या उत्सवासाठी सनदा करून दिल्या. छत्रपती राजाराम महाराजांनी श्रीरामचंद्राचा आदर्श त्यांच्या मुद्रेतून व्यक्त केला. ◆ छत्रपती शिवाजी महाराज...!! समकालीन शिवभारतातील मधील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायणाचा विद्याभ्यास केला असे वर्णन येते. “श्रृनतस्मृनतपुराणेषु भारते दण्डनीतिषु । समस्तेश्वपि शास्त्रेषु काव्ये रामायणे तथा ॥३४॥  भावार्थ :- छत्रपती शिवाजी महाराजानी श्रुती, स्मृती , पुराणें, महाभारत, राजनीती सर्व शास्त्रे रामायण यांचा विद्याभ्यास केला. संभाजी महाराजांनी केशवभट यांचा मुलगा रामचंद्र भट याला दानपत्र दिले. केशवपंडित नावाच्या ब्राम्हणाने छत्रपती शिवाजी महाराजांनसमोर प्रयोगरूप रामायण कथन केले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संतुष्ट होऊन श

पळशिकरांचा वाडा , पळशी ता. पारनेर

इमेज
 ★  पळशिकरांचा वाडा   पळशी , ता. पारनेर   महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जी इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखली जातात. अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी. पळशी गाव हे भुईकोटातच वसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग ठरावा, इतके हे गाव टुमदार आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा व मंदिराची उभारणी केली. भुईकोटात दगड व चौकोनी विटांचे चार वाडे आहेत. सध्या यातील केवळ एकच वाडा सुस्थितीमध्ये असून पाहण्यास खुला देखील आहे. हाच पेशव्यांचे सरदार आनंदराव पळशीकर यांचा वाडा.  या वाड्यातील नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. पळशीकरांचा हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा एक अप्रतिम नमुनाच... वाड्याच्या दरवाजा तसेच चौकटीवर उत्कृष्ट कोरीवकाम केलेले आहे. म

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोगलांच्या कैदेतून आर्थिक अडचणी नंतर चिंचवडच्या मोरया गोसावी यांना लिहीलेले पत्र..

इमेज
    २४ एप्रिल १७०५ या दिवशी   महाराणी  येसूबाई राणीसाहेबांनी   मोघलांच्या कैदेतून  आर्थिक अडचणी नंतर   चिंचवडच्या  मोरया गोसावी यांना लिहिलेलं पत्र....   येसूबाई राणीसाहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर अत्यंत बिकट परिस्थितीत मोगलांच्या स्वाधीन झाल्या होत्या .औरंगजेबाने त्यांची खास व्यवस्था केली होती.येसूबाई राणी साहेबांच्या बरोबर कैदेत  राजघराण्यातील अनेक लोक होते.  वारंवार होणारी आक्रमणे ,छावणीतील  लवाजम्याचा खर्च, त्यात भर म्हणून कैद्यांची व्यवस्था आणि मोगलांकरीता  उत्तरे कडून येणारे अन्नधान्य, खजिना मराठे मधेच अर्ध्यापेक्षा जास्त लुटत असल्याने औरंगजेबाची आर्थिक स्थिती खालावत चालली होती .आपल्या राजधानी पासून दूर असलेल्या या मोगल बादशहाला महाराष्ट्रात आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.           औरंगजेब येसूबाई व शाहू महाराजांना सुखसोयी पोहचवत असला तरी छावणीतील इतर लोकांप्रमाणे येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे यांनाही आर्थिक गोष्टीचा सामना करावा लागत होता. यावेळी येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे अहमदनगरच्या किल्ल्यात होते. दुष्काळी परिस्थितीची झळ आपल्याला लागत आहे, तेव्हा कर्ज

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची

इमेज
  थोरले शाहू महाराज आणि   हुक्का हिंदनृपती   गाथा छत्रपती संभाजी पुत्राची शहाजी राजांनी पाया भरलेल्या स्वराज्याची इमारत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली,संभाजी राजांनी प्राण पणाने लढवली,वाढवली.राजाराम राजे आणि ताराराणी यांनी सुद्धा तळहातावर गर्दन पेलत मराठी मुलुखाच राज सिहासंन अबाधित ठेवलं.मराठी मुलखात असलेले हिंदवी स्वराज्य अखंड हिंदुस्थानभर पसरवत मराठा साम्राज्याचा विस्तार केला तो शंभूपुत्र शाहू राजांनी. या शाहू राजांच्या आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी घडल्या त्यात संपूर्ण  बालपण कैदेत गेलं.महाराणी येसूबाईंनी वाढवलेला शंभूपुत्र जेव्हा कैदेतून सुटला तेव्हा आला थेट मायभूमीत.पुन्हा एकदा मराठी ताकद वाढवत असा सुसाट सुटला की अवघ्या काही दिवसात संपूर्ण भारतभर मराठे पसरवले.जे पराक्रमी होते त्यांना संधी दिली,कर्तृत्वाने होते त्यांना नेतृत्व दिलं.आणि पाहता पाहता स्वराज्याच साम्राज्य निर्माण झालं.पूर्व पश्चिम १३०००कि.मी दक्षिण उत्तर १७००० कि.मी चा प्रदेश मराठी भीमठडी घोड्यांच्या टॉपाखाली आला. अतिशय तेजस्वी असा राजा जणू छत्रपती शिवाजी राजांची सावली म्हणून त्यांना संबोधलं जात.शाहू राजा म्हणजे इतिह

रायगड किल्ल्या चे बांधकाममंत्री मुख्य अभियंता हिरोजी इंदलकर

इमेज
historyallroyal.blogspot . com रायगड किल्ल्या  चे   बांधकाममंत्री मुख्य  अभियंता   हिरोजी इंदलकर .! रायगड प्रवेशद्वार, हाच तो अभेद्य असा महादरवाज्या जो सर्व सुख दुःखाचा साक्षीदार आहे. घर तेव्हाच टिकते जेव्हा घराचा पाया आणि दरवाजा भक्कम असतो. १० वर्ष चाललेले गडावरील बांधकाम म्हणजे एक अद्भुत कलेचा जणू नमुनाच... ३५० वर्षानंतर ही ऊन वारा पाऊस खाऊन दिमाखात उभे आहे. ज्यांनी गडाचे बांधकाम पूर्णत्वास नेले ते महान मुख्य अभियंता हिरोजी इंदलकर. कसलीही धन दौलत ,आपेक्षा,पद आणि मानसन्मानाची इर्षा नसणारा महाराज्यांचा निष्ठावंत मावळा. जेव्हा गड बांधून पूर्ण होतो तेव्हा  महाराज विचारात"हिरोजी मागा काई हवे ते सोने,नाणे,जहागिरी" त्यावर हिरोजी बोलतात राजे मला यातील काही नको,फक्त" जगदीश्वराच्या मंदिरा बाहेरील पायरीवर ऐक शिला लावायची परवानगी द्यावी. राजे आश्चर्य चकित होऊन विचार करतात एवढा मोठा गड बांधताना ही अशी विनंती कधी व्यक्त नाही केली. हिरोजिनी आणि अत्ता असे का विचारले असेल,आणि बोलतात १० वर्ष मेहनत घेऊन स्वतःची संपत्ती विकून तुम्ही इतका विशाल गड बांधलात आणि मागून काई मगितलेत फक्त पायरीवर

थोरले संभाजीराजे भोसले समाधी

इमेज
  historyallroyal.blogspot.com राजमाता जिजाऊ पुत्र थोरले संभाजीराजे भोसले समाधी कनकगिरी जिल्हा कोप्पळ    ..!!  कनकगिरी जिल्हा कोप्पळ राज्य कर्नाटक बेळगावहून हुबळी मार्गाने कनकगिरी 269 किलोमीटर अंतरावर आहे या कोप्पळ जिल्ह्यातील कनकगिरी मध्ये नायक राजांनी बांधलेले भव्य पुरातन मंदिर हि आहे कणकचलपती मंदिर तसेच या ठिकाणी थोरले संभाजीराजे महाराज यांची समाधी हि आहे.  ज्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी  हे विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्य घडवले त्यांचे जेष्ठ बंधू .ज्या राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्काराने शिवशंभूराजेंसारखे महान राजे घडवले आणि ज्या महाबली शहाजीराजे महाराज यांनी परकीय शत्रूत राहून हि आपला सार्वभौम राजाप्रमाणे चोहोमुलखात दरारा निर्माण केला अश्या महापराक्रमी महापित्यांचे  जेष्ठ पुत्र  थोरले संभाजीराजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीला चकित करून टाकणारी धडक दिली.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेसह थेट पुण्याहून थेट मुसंडी मारली ती मासूरवर नोव्हेंबर इसवी सन 1656 पुर्वी  हे मासूर ठिकाण कर्नाटक च्या धारवाड जिल्ह्याच्या दक्षिण हद्दीवर वसलेले आहे.आदिलशाहाने

मेंढा तोफ देवगिरी किल्ला औरंगाबाद

इमेज
मेंढा तोफ देवगिरी किल्ला औरंगाबाद  historyallroyal.blogspot.com अतिशय सुंदर व नक्षीकाम केलेली... मेंढा तोफ देवगिरी किल्ला औरंगाबाद,महाराष्ट्र historyallroyal.blogspot.com historyallroyal.blogspot.com

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी

इमेज
historyallroyal.blogspot.com ◆ १२७ वर्षानंतर पुन्हा एकदा रायगडावर महाराष्ट्रातील समस्त मालुसरे परिवाराचा सन्मान होणार.... श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर ३४२ वा शिवपुण्यतिथी सोहळा दि १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे. यावेळी भारत सरकारमधील केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ना ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना अकरावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना सैन्यदल अधिकारी सन्मान पुरस्कार तर सरदार घराण्यासाठी देण्यात येणारा सन्मान पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक गावांत स्थायिक असलेल्या समस्त मालुसरे परिवाराला देण्यात येणार असल्याची घोषणा सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे यांनी केली आहे. १२७ वर्षापूर्वी २५ एप्रिल १८९६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या उत्सवात त्यावेळी तानाजी मालुसरे व येसाजी कंक इत्यादींच्या वंशजांस मानाचे नारळ देण्यात आल्याची नोंद त्यावेळच्या दैन

बागलाण परिसरातील किल्ले मुल्हेर - मोरागड - हरगड..

इमेज
historyallroyal.blogspot.com   बागलाण परिसरातील किल्ले मांगीतुंगी मुल्हेर - मोरागड - हरगड        मांगी - तुंगी मुक्कामावरून सकाळी ६.०० वाजता आम्ही मुल्हेर किल्ल्याकडे मार्गस्थ झालो. मुल्हेरगडाला जाताना आम्ही आमच्या बॅग धनगरीवाडीतील एका घरात ठेवून आम्ही गडाची वाट धरली होती. आमच्या दोन मोटारसायकल घेवून आम्ही मुल्हेरगडाच्या जवळ गेलो तेव्हा मुल्हेर माचीवरील दरवाजा व महादेव मंदिर पाहुन आम्ही सामेश्वर मंदिरात गेलो.  सामेश्वर मंदिरातील अध्यात्मिक वातावरण पाहुन मन खुप भारावून गेले होते. सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये गणेश मुर्ती, मारुती मूर्ती, दोन शिवपिंडी आणि एक तोफगोळा या सर्व अवशेषांची मांडणी करून ठेवण्यात आली होती. historyallroyal.blogspot.com  सोमेश्वर मंदिरापासून काही अंतरावरतीच तलावातील महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये गणेश शिल्प खूपच सुंदर पद्धतीने कोरण्यात आले होते. महादेव मंदिर पाहून आम्ही मुल्हेरगडाच्या मूळ वाटेस लागलो साधारणता पाऊनतासाची पायपीट केल्यानंतर आम्ही मारुतीशिल्पा जवळ पोहोचलो होतो.मारुतीरायाला वंदन करून आम्ही मुल्हेरगडाच्या प्रथम प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो आणि या दरवाजा सम

ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ,वेळापुरची अप्रतिम हर गौरी मुर्ती , शिवपार्वती Shivparvati अर्धनारी नटेश्वर

इमेज
historyallroyal.blogspot.com अर्धनारी नटेश्वर उमा महेश्वर शिवपार्वती वेळापूर.... महादेवाची पूजा मुर्ती रूपात कुठेच केली जात नाही. पण वेळापुर (ता. माळशिरस, जि. सोलापुर) हे एकमेव मंदिर आहे जिथे शिव मुर्तीरूपात पार्वती सोबत पुजले जातात. स्थानिक चुकीने या मुर्तीला अर्धनारी नटेश्वर या नावाने संबोधतात. प्रत्यक्षात ही एक मुर्ती नसून उमा महेश्वराची संयुक्त मुर्ती आहे.  यादवांच्या काळातील १३ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर. महादेवाच्या शाळुंकेवर पिंड असावी तशी ही मुर्ती शिल्पांकित केली आहे.  शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात वरद मुद्रेत असून हातात अक्षयमाला आहे. डाव्या वरच्या हातात नागफणा असून हा हात पार्वतीच्या केसांच्या पाठीमागे आहे. खालचा डावा हात पार्वतीच्या कंबरेवर आहे. शिवाच्या जटामुकूटावर चंद्र सुर्य कोरलेले आहेत. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे. दूसर्‍या हातात फासा आहे.  historyallroyal.blogspot.com शिवाचा जटामुकूट तर पार्वतीचा मराठमोळा शोभणारा अंबाडा प्रभावळी सारखा डोक्या मागे कोरलेला आहे. अंबाजोगाई, निलंगा येथील उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीचा केशसंभार असाच दर्

मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदर किल्ला

इमेज
historyallroyal.blogspot.com मुरारबाजी देशपांडे.... पुरंदर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील मधील सासवड पासून किमान अवघ्या 15km असलेला भक्कम बलाढ्य पुरंदरचा गिरीदुर्ग आहे.  हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण क्षणांचा आठवणींचा साक्षीदार हिंदवी स्वराज्याच्या थोरल्या युवराजांच्या जन्माने  मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याने पावन झालेला हा पुरंदरचा किल्ला आजही आपल्या गौरवशाली ,वैभवशाली ,ज्वलंत, इतिहासाच्या आठवणींचा साक्षीदार म्हणून दिमाखात उभा आहे पुरंदरच ते मुरारबाजींचे  स्मारक आजही वीर मुरारबाजींच्या शौर्याची ,पराक्रमाची स्वामिनिष्ठेची आठवण करून देतेय.  मुरारबाजी देशपांडे यांच्या  सारखा हिरा मोर्यांच्या फौजेत पारखला आणि जेव्हा जावळीच्या चंद्रराव मोरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बिमोड केला तेव्हा महाराजांनी मुरारबाजी सारख्या रत्नास स्वराज्यात आणले .मुरारबाजींच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेचा इतिहास वाचला किंवा ऐकला तरी आभिमान वाटतो  मुरारबाजींच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेच्या परमपवित्र इतिहासाची साक्ष आजही  किल्ले पुरंदर श्रीमान मुरारबाजींचे प्रसन्न स