Dwarkadhish temple pandharpur shinde द्वारकाधीश मंदिर पंढरपूर ग्वाल्हेरच्या शिंदे सिंधिया घराण्या चे

 द्वारकाधीश मंदिर पंढरपूर ग्वाल्हेर च्या शिंदे सिंधिया घराण्याचे



पंढरपूर म्हणजे प्रत्येकाला जाण्याची ओढ लागलेली नाही असा भाविक सापडणे अशक्य गेली किमान १५०० वर्षे विठुमाऊलीशी आपले हे घट्ट नाते जुळलेले आहे...

द्वारकाधीश मंदिर



तो देव,ते मंदिर, तो परिसर,ती भक्तमंडळी हे सगळेच माझ्या अतिशय आवडीचे...नुकताच तिथे गेलो, दर्शन घेतले अन् चंद्रभागेच्या दिशेकडील एका भरदार बुरुजाने माझे लक्ष वेधून घेतले.

तिथे पोचलो आणि एका अस्सल मराठी स्थापत्याचे भारदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळाले...


ते आहे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे द्वारकाधीश मंदिर.दौलतराव शिंदे यांच्या पत्नी बायजाबाई यांचे माहेर अक्कलकोट कडचे.तिकडचा जो काही वाटा त्यांना मिळाला,त्यातून हे भव्य धर्मसंकुल उभारले गेले...

सगळे बांधकाम चिरेबंदी आहे आणि त्याला चंद्रभागेच्या पुराचा उपसर्ग होणार नाही अशा मजबुतीने घडवले गेले आहे. बाहेरील रस्त्यापेक्षा आतील भाग १२/१४ फूट उंच आहे... 



चारी बाजूंनी कोट,ओवऱ्या, प्रदक्षिणा मार्ग व मध्ये २४ खांबी मंडप,मागे मंदिराचा गाभारा,वर ५ थरांचे शिखर अशी रचना केलेली आहे... 

रुक्मिणी व राधेसह द्वारकेचा राणा सुंदर आकर्षक मेघडंबरीत उभा आहे.तिथेच बायजाबाईंची मूर्तीपण दिसते.मंडपात शिंदे घराण्यातील वीरांची चित्रेपण पाहता येतात....

पंढरीला गेलात तर आवश्य भेट द्या...!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

The second time Surat was looted, Shivaji Maharaj cut off Aurangzeb's nose दुसऱ्यादा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी औरंगजेब चे नाक कापले

Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदर किल्ला