पोस्ट्स

पुरंदर किल्ला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदर किल्ला

इमेज
historyallroyal.blogspot.com मुरारबाजी देशपांडे.... पुरंदर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील मधील सासवड पासून किमान अवघ्या 15km असलेला भक्कम बलाढ्य पुरंदरचा गिरीदुर्ग आहे.  हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण क्षणांचा आठवणींचा साक्षीदार हिंदवी स्वराज्याच्या थोरल्या युवराजांच्या जन्माने  मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याने पावन झालेला हा पुरंदरचा किल्ला आजही आपल्या गौरवशाली ,वैभवशाली ,ज्वलंत, इतिहासाच्या आठवणींचा साक्षीदार म्हणून दिमाखात उभा आहे पुरंदरच ते मुरारबाजींचे  स्मारक आजही वीर मुरारबाजींच्या शौर्याची ,पराक्रमाची स्वामिनिष्ठेची आठवण करून देतेय.  मुरारबाजी देशपांडे यांच्या  सारखा हिरा मोर्यांच्या फौजेत पारखला आणि जेव्हा जावळीच्या चंद्रराव मोरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बिमोड केला तेव्हा महाराजांनी मुरारबाजी सारख्या रत्नास स्वराज्यात आणले .मुरारबाजींच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेचा इतिहास वाचला किंवा ऐकला तरी आभिमान वाटतो  मुरारबाजींच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेच्या परमपवित्र इतिहासाची साक्ष आजही  किल्ले पुरंदर श्रीमान मुरारबाजींचे प्रसन्न स