पोस्ट्स

महाराणी येसूबाई यांनी मोगल कैदेत आर्थिक अडचण चिंचवडच्या मोरया गोसावी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोगलांच्या कैदेतून आर्थिक अडचणी नंतर चिंचवडच्या मोरया गोसावी यांना लिहीलेले पत्र..

इमेज
    २४ एप्रिल १७०५ या दिवशी   महाराणी  येसूबाई राणीसाहेबांनी   मोघलांच्या कैदेतून  आर्थिक अडचणी नंतर   चिंचवडच्या  मोरया गोसावी यांना लिहिलेलं पत्र....   येसूबाई राणीसाहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर अत्यंत बिकट परिस्थितीत मोगलांच्या स्वाधीन झाल्या होत्या .औरंगजेबाने त्यांची खास व्यवस्था केली होती.येसूबाई राणी साहेबांच्या बरोबर कैदेत  राजघराण्यातील अनेक लोक होते.  वारंवार होणारी आक्रमणे ,छावणीतील  लवाजम्याचा खर्च, त्यात भर म्हणून कैद्यांची व्यवस्था आणि मोगलांकरीता  उत्तरे कडून येणारे अन्नधान्य, खजिना मराठे मधेच अर्ध्यापेक्षा जास्त लुटत असल्याने औरंगजेबाची आर्थिक स्थिती खालावत चालली होती .आपल्या राजधानी पासून दूर असलेल्या या मोगल बादशहाला महाराष्ट्रात आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.           औरंगजेब येसूबाई व शाहू महाराजांना सुखसोयी पोहचवत असला तरी छावणीतील इतर लोकांप्रमाणे येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे यांनाही आर्थिक गोष्टीचा सामना करावा लागत होता. यावेळी येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे अहमदनगरच्या किल्ल्यात होते. दुष्काळी परिस्थितीची झळ आपल्याला लागत आहे, तेव्हा कर्ज