पोस्ट्स

bhalvani gadhi ashti beed भाळवणी गढी ता आष्टी बीड येथील लेबलसह पोस्ट दाखवत आहे

bhalvani gadhi ashti beed भाळवणी ता आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी

इमेज
भाळवणी आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी   फलटणकर मुधोजी निंबाळकर यांचें जेष्ठ पुत्र राजे जगदेवराव यांचें वंशज राजे सुलतान राव राजे निंबाळकर यांची गढी तसेच महाराष्ट्राचे आदर्श माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री कै. श्री  विलासरावजी देशमुख यांच्या  मामाचा गढीचा वाडा‌‌ होय.... हा गढीचा वाडा खूपच मजबूत आणि सुंदर असून बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या गढीचा एक बुरुज जंग्या युक्त, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मजबूत असून खूपच सुंदर आहे. गढीला तीन प्रवेशद्वार असून खूपच मजबूत आणि सुंदर आहेत ‌. एका प्रवेशद्वाराला पुरातन आणि मजबूत असा लाकडी दरवाजा आहे ‌.  ◆ गढी मध्ये पाण्याचा आड  ( विहीर )... गढी मधे एक पाण्याचा आड ( विहीर) असून संपूर्ण विट बांधकाम असलेली माझ्या पाहाण्यात आलेली पहिली विहीर आहे.  गढीच्या आतील उघड खांबी माळवदाच्या बैठक व्यवस्थेच्या खांबाचे तळखडे खूपच सुंदर आणि नक्षीदार आहेत ‌.  या गढीस पुर्वी  खंदक होता असे सुलतानराव निंबाळकरांचे वंशज श्री अरुणराव निंबाळकर यांनी सांगितले आहे पण आता खंदक नामशेष झाला आहे.  या गढीच्या समोरच एक सुंदर अशी शिवपिंडी सारखी सुंदर बारव  आहे...  मित्र