पोस्ट्स

बागलाण परिसरातील किल्ले मुल्हेर - मोरागड - हरगड...मांगीतुंगी ऐतिहासिक वास्तू लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बागलाण परिसरातील किल्ले मुल्हेर - मोरागड - हरगड..

इमेज
historyallroyal.blogspot.com   बागलाण परिसरातील किल्ले मांगीतुंगी मुल्हेर - मोरागड - हरगड        मांगी - तुंगी मुक्कामावरून सकाळी ६.०० वाजता आम्ही मुल्हेर किल्ल्याकडे मार्गस्थ झालो. मुल्हेरगडाला जाताना आम्ही आमच्या बॅग धनगरीवाडीतील एका घरात ठेवून आम्ही गडाची वाट धरली होती. आमच्या दोन मोटारसायकल घेवून आम्ही मुल्हेरगडाच्या जवळ गेलो तेव्हा मुल्हेर माचीवरील दरवाजा व महादेव मंदिर पाहुन आम्ही सामेश्वर मंदिरात गेलो.  सामेश्वर मंदिरातील अध्यात्मिक वातावरण पाहुन मन खुप भारावून गेले होते. सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये गणेश मुर्ती, मारुती मूर्ती, दोन शिवपिंडी आणि एक तोफगोळा या सर्व अवशेषांची मांडणी करून ठेवण्यात आली होती. historyallroyal.blogspot.com  सोमेश्वर मंदिरापासून काही अंतरावरतीच तलावातील महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये गणेश शिल्प खूपच सुंदर पद्धतीने कोरण्यात आले होते. महादेव मंदिर पाहून आम्ही मुल्हेरगडाच्या मूळ वाटेस लागलो साधारणता पाऊनतासाची पायपीट केल्यानंतर आम्ही मारुतीशिल्पा जवळ पोहोचलो होतो.मारुतीरायाला वंदन करून आम्ही मुल्हेरगडाच्या प्रथम प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो आणि या दरवाजा सम