बागलाण परिसरातील किल्ले मुल्हेर - मोरागड - हरगड..

historyallroyal.blogspot.com 

बागलाण परिसरातील किल्ले मांगीतुंगी मुल्हेर - मोरागड - हरगड

       मांगी - तुंगी मुक्कामावरून सकाळी ६.०० वाजता आम्ही मुल्हेर किल्ल्याकडे मार्गस्थ झालो. मुल्हेरगडाला जाताना आम्ही आमच्या बॅग धनगरीवाडीतील एका घरात ठेवून आम्ही गडाची वाट धरली होती. आमच्या दोन मोटारसायकल घेवून आम्ही मुल्हेरगडाच्या जवळ गेलो तेव्हा मुल्हेर माचीवरील दरवाजा व महादेव मंदिर पाहुन आम्ही सामेश्वर मंदिरात गेलो.

 सामेश्वर मंदिरातील अध्यात्मिक वातावरण पाहुन मन खुप भारावून गेले होते. सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये गणेश मुर्ती, मारुती मूर्ती, दोन शिवपिंडी आणि एक तोफगोळा या सर्व अवशेषांची मांडणी करून ठेवण्यात आली होती.

 सोमेश्वर मंदिरापासून काही अंतरावरतीच तलावातील महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये गणेश शिल्प खूपच सुंदर पद्धतीने कोरण्यात आले होते. महादेव मंदिर पाहून आम्ही मुल्हेरगडाच्या मूळ वाटेस लागलो साधारणता पाऊनतासाची पायपीट केल्यानंतर आम्ही मारुतीशिल्पा जवळ पोहोचलो होतो.मारुतीरायाला वंदन करून आम्ही मुल्हेरगडाच्या प्रथम प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो आणि या दरवाजा समोर नतमस्तक होऊन मुल्हेरगडावर प्रवेश केला. मुल्हेरगडावर पाण्याच्या टाक्या, राजवाडा, बालेकिल्ला,तटबंदीचे अवशेष , बुरुजाचे अवशेष, दिंडी दरवाजा यासारखे अवशेष मुल्हेरगडावरती पाहण्यास मिळतात.

          मुल्हेरगड पाहून आम्ही मोरागड पाहण्यास निघालो होतो. मुल्हेरगडाच्या दिंडी दरवाजातून बाहेर पडल्यानंतर मोरागडाचेचे दरवाजे खूप सुंदररित्या दिसून येतात. दिंडी दरवाजा पार करून आम्ही मोरागडाच्या टप्प्यांमध्ये पोचलो होतो आणि काही वेळा मध्ये मोरागडाचे २ प्रवेशद्वार सर करून आम्ही मोरागडावर प्रवेश केला होता. मोरागडावर पाण्याची टाकी, दोन दरवाजे, तटबंदीचे अवशेष काही प्रमाणात आणि उद्वस्त बुरुज अशा प्रकारे मुल्हेरगडाचा जोड दुर्ग मोरागड पाहून आम्ही मुल्हेर पासून जवळ असणारा हरगड पाहण्यास निघालो होतो. 

historyallroyal.blogspot.com

        मुल्हेरगडाच्या पायथ्यापासून एक पायवाट हरगडास जाते त्या वाटेने आम्ही मुल्हेर आणि हरगड यामधील खिंड पार करून हरगडच्या पायथ्याशी पोहोचलो होतो. हरगडाच्या पायथ्याशी पवार काका भेटले त्यांनी आम्हास थंडगार पाणी दिले आणि आमचा थकवा कुठल्या कुठे भूर झाला . पवार काकांनी हरगडाची आम्हास वाट दाखवून दिली आणि आम्ही हरगडाच्या मार्गास लागलो. 

एक तासाची पायपीट केल्यानंतर आणि पायपीटीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काटेदार वनस्पतीचा सामना करत हरगड चढावे लागत होता. हरगडावर चार दरवाजे, दोन पाण्याच्या टाक्या, तलाव, वाड्यांचे अवशेष, चोरदरवाजा, हजारबगादी तोफ असे अवशेष हरगडावरती आहेत. हरगड पाहून आम्ही गड उतार झाले पुन्हा मुल्हेरच्या पायवाटेने खाली आलो आणि साल्हेरवाडीकडे मार्गस्थ झालो..

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची