Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला..




इतिहास बऱ्याच काळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली या भागांकडे धावतो आहे. 

या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक प्रचंड असा हा दुर्ग इथे ठाण मांडून बसलेला धुळे भागाचा संरक्षण “किल्ला लळींग” होय.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारूकी’ एक मोठे घराणे.

या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा किल्ला लळींग...

लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील इसवी सन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली.

 इसवी सन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखान कडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला.

 त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीर खानचा लळींग किल्ल्या खालीच पराभव झाला.

  पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता.

 इसवीसन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळींगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू  लागला.

 तो १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत होता इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे..

या किल्ल्याला एक वेळ आवश्यक भेट द्या

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

bhalvani gadhi ashti beed भाळवणी ता आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी