रायगड किल्ल्या चे बांधकाममंत्री मुख्य अभियंता हिरोजी इंदलकर

historyallroyal.blogspot.com

रायगड किल्ल्या चे बांधकाममंत्री मुख्य अभियंता हिरोजी इंदलकर .!

रायगड प्रवेशद्वार,हाच तो अभेद्य असा महादरवाज्या जो सर्व सुख दुःखाचा साक्षीदार आहे.

घर तेव्हाच टिकते जेव्हा घराचा पाया आणि दरवाजा भक्कम असतो.

१० वर्ष चाललेले गडावरील बांधकाम म्हणजे एक अद्भुत कलेचा जणू नमुनाच...

३५० वर्षानंतर ही ऊन वारा पाऊस खाऊन दिमाखात उभे आहे.


ज्यांनी गडाचे बांधकाम पूर्णत्वास नेले ते महान मुख्य अभियंता हिरोजी इंदलकर. कसलीही धन दौलत ,आपेक्षा,पद आणि मानसन्मानाची इर्षा नसणारा महाराज्यांचा निष्ठावंत मावळा.

जेव्हा गड बांधून पूर्ण होतो तेव्हा  महाराज विचारात"हिरोजी मागा काई हवे ते सोने,नाणे,जहागिरी"

त्यावर हिरोजी बोलतात राजे मला यातील काही नको,फक्त" जगदीश्वराच्या मंदिरा बाहेरील पायरीवर ऐक शिला लावायची परवानगी द्यावी.


राजे आश्चर्य चकित होऊन विचार करतात एवढा मोठा गड बांधताना ही अशी विनंती कधी व्यक्त नाही केली.

हिरोजिनी आणि अत्ता असे का विचारले असेल,आणि बोलतात १० वर्ष मेहनत घेऊन स्वतःची संपत्ती विकून तुम्ही इतका विशाल गड बांधलात आणि मागून काई मगितलेत फक्त पायरीवर शिला लावायची परवानगी,हिरोजी हे काई विचाराने झाले,हिरोजी बोलतात महाराज फक्त हिच इच्छा आहे माझी....


ही तीच पायरी ज्या वेळेस आपण जगदीश्वराचे दर्शन घेऊन महाराज्यांच्या समाधीस्थळी प्रवेश करतो तिथे आहे.

historyallroyal.blogspot.com

त्यावरील कोरलेले शब्द "सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदलकर" असे करण्याचे कारण राजन विचारात तेव्हा हिरोजी बोलतात , जेव्हा महाराज तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाताल तेव्हा तुमचे चरणस्पर्श कायम माझ्या  नावाला होत राहील....


काई माणसे जोडली होती महाराज्यांनी,कसले तेजस्वी तेज होते त्यांचे कायम विचार स्वराज्याचा अश्या या माझ्या राज्याला आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा,मानाचा मुजरा...!!

historyallroyal.blogspot.com

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदर किल्ला