historyallroyal.blogspot.com
मुरारबाजी देशपांडे....
पुरंदर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तहसील मधील सासवड पासून किमान अवघ्या 15km असलेला भक्कम बलाढ्य पुरंदरचा गिरीदुर्ग आहे.
हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण क्षणांचा आठवणींचा साक्षीदार हिंदवी स्वराज्याच्या थोरल्या युवराजांच्या जन्माने मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याने पावन झालेला हा पुरंदरचा किल्ला आजही आपल्या गौरवशाली ,वैभवशाली ,ज्वलंत, इतिहासाच्या आठवणींचा साक्षीदार म्हणून दिमाखात उभा आहे पुरंदरच ते मुरारबाजींचे स्मारक आजही वीर मुरारबाजींच्या शौर्याची ,पराक्रमाची स्वामिनिष्ठेची आठवण करून देतेय.
मुरारबाजी देशपांडे यांच्या सारखा हिरा मोर्यांच्या फौजेत पारखला आणि जेव्हा जावळीच्या चंद्रराव मोरेंचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बिमोड केला तेव्हा महाराजांनी मुरारबाजी सारख्या रत्नास स्वराज्यात आणले .मुरारबाजींच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेचा इतिहास वाचला किंवा ऐकला तरी आभिमान वाटतो मुरारबाजींच्या शौर्याची आणि स्वामीनिष्ठेच्या परमपवित्र इतिहासाची साक्ष आजही किल्ले पुरंदर श्रीमान मुरारबाजींचे प्रसन्न स्मारक देतेय...
इसवी सन 1665 ला मुघलसरदार मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी चाळीस ते पन्नास हजार फौजेंशी पुरंदरास वेढा घातला पुरंदर वरती सरदार श्रीमान मुरारबाजीं देशपांडे आणि एक हजार मावळे होते दिलेरखानाने व्रजगड घेऊन सफेद बुरूजांवरून पुरंदरावरती चाल केली.
दिलेरखानाने पाच हजार कडवे पठाण घेऊन थेट बालेकिल्ल्यावरती चालून आला सरदार मुरारबाजींनी आपल्या बरोबर सातशे मावळे घेऊन दिलेरखानास प्रत्युत्तर दिले.
आपल्या पाच हजार पठाण फौजेशी मुरारबाजी आणि त्यांचे अवघे सातशे मावळे भिडतात काय धाडस शौर्याने सामना करतात हे अतुलनीय शौर्य पाहून दिलेखानाने श्रीमान मुरारबाजींना आपल्याकडे येण्यास सांगितले तर श्रीमान मुरारबाजी म्हणाले मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो का? काय ती स्वामीनिष्ठा वर्णन हि कसे आणि काय करावे खरंच श्री. मुरारबाजींच्या स्वामीनिष्ठेस मानाचा मुजरा मुरारबाजी थेट दिलेखानावर चालून गेले खानावर वार करणार तोच खानाने मुरारबाजींवरती लागोपाठ तीन तिर मारून घायाळ केले व लढता-लढता मुरारबाजीं देशपांडे पुरंदरच्या वीरभूमी वरती धारातीर्थी पडले.
वीर मुरारबाजी धारातीर्थी पडले....
जेव्हा राजांना हि वार्ता कळली राजांना फार दुःख झाले राजांनी मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्याशी तहाची बोलणी सुरू केली आणि 11जून 1665 रोजी पुरंदरचा तह झाला. वीर मुरारबाजीं देशपांडे शेवटपर्यंत आपली स्वामीनिष्ठा त्यांनी सोडली नाही असे रणांगणावर आपले अतुलनीय शौर्य गाजवून रणांगणात आपला देह ठेवला आजही त्या शौर्याची साक्ष पुरंदरचा किल्ला देतोय.
मुरारबाजी देशपांडे यांची समाधी...
वीर मुरारबाजी देशपांडे यांची समाधी त्यांच्या गावी कोकणातील किंजळोली ता.महाड जिल्हा रायगड येथे आहे. या ठिकाणी एक वेळा तरी आवश्यक भेट द्या.वीर मुरारबाजी यांना शत शत नमन....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा