Mallikarjun mahadev nhavre tal shirur श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर

श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर


  सौराष्ट्र सोमनाथ ,श्री         शैले मल्लिकार्जुनम !!


  मल्लिकार्जुन महादेव हे बारा ज्योतिर्लिंग मधील दुसरे ज्योतिर्लिंग

  श्री शैल्यम चा मल्लिकार्जुन महादेव म्हणून भारतभर प्रसिध्द आहे....

महादेवाचे दुसरे नाव मल्लिकार्जुन आहे...

अशा मल्लिकार्जुन महादेवाच्या नावाने आनेक मंदिर महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात.

असच एक मल्लिकार्जुन महादेवा च मंदिर शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात आहे. 



न्हावरे गावाचा महादेव म्हणजे जागृत देवस्थान .

या मल्लिकार्जुन महादेवाच मंदिर हे भव्यदिव्य असून मुळ बांधणी चालुक्यशैलीतील असून वेळोवेळी त्याचा जिर्णोद्धार झालेला आहे.

मंदिराच्या दरवाजावर असलेल्या शिलालेखा नुसार जोशीपारखी यांनी याचा जिर्णोद्धार केलेला समजतो.

पुढे पेशवेकाळात या मंदिराच्या देवस्थानाला रिसबुड घराण्याकडून दिवाबत्ती साठी खुपसारी जमिन दान दिली होती....

 रिसबुड हे सावकरी करीत होते. करडे महालाची व्यवस्थाही हे पेशवेकाळात पाहात होते...


मल्लिकार्जुन च्या कावडीचा इतिहास पाहता ही कावड पाच वेळा निघते.



1) चैत्र पाडवा - आलेगाव भीमा नदी

२) चैत्र एकादशी - शिखर शिंगणापूर

३) चैत्र पौर्णिमा - आलेगांव यात्रेचा मान

४) श्रावणी शेवटचा सोमवार - भुलेश्वर देवस्थान पुरंदर

५) महाशिवरात्री - संतराज महाराज समाधी

हि कावड कांडगेपाटील, वाघचौरेपाटील व बहिरटपाटील या तिन घराण्याकडून सरु होते.

ही कावड न्हावरे गावातील या मंदिरातून निघून ती शिखरशिंगणापूरच्या महादेवाला नेली जाते...

तिथून ती परत न्हावरे गावात येऊन ती आलेगाव पागा च्या वाघचौरे घराण्याकडे सुपूर्त केली जाते. ती कावड तेथील मंदिरात नाचवली जाते.

 दुसरी कावड महाशिवरात्रीला मल्लिकार्जुन मंदिरातून अभिषेक पुजाअर्चा करुन हर हर महादेवाच्या नामघोषणात रांजणगाव - सांडशी वाळकी- संगम बेट येथील संगमेश्वर येथील [ १७ व्या शतकातील संत ] श्री संतबाबा { संतोबा } पवार यांच्या समाधीस्थानी नेली जाते...


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची