थोरले संभाजीराजे भोसले समाधी

 historyallroyal.blogspot.com

राजमाता जिजाऊ पुत्र थोरले संभाजीराजे भोसले समाधी कनकगिरी जिल्हा कोप्पळ  ..!!


 कनकगिरी जिल्हा कोप्पळ राज्य कर्नाटक

बेळगावहून हुबळी मार्गाने कनकगिरी 269 किलोमीटर अंतरावर आहे या कोप्पळ जिल्ह्यातील कनकगिरी मध्ये नायक राजांनी बांधलेले भव्य पुरातन मंदिर हि आहे कणकचलपती मंदिर तसेच या ठिकाणी थोरले संभाजीराजे महाराज यांची समाधी हि आहे. 

ज्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी  हे विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्य घडवले त्यांचे जेष्ठ बंधू .ज्या राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्काराने शिवशंभूराजेंसारखे महान राजे घडवले आणि ज्या महाबली शहाजीराजे महाराज यांनी परकीय शत्रूत राहून हि आपला सार्वभौम राजाप्रमाणे चोहोमुलखात दरारा निर्माण केला अश्या महापराक्रमी महापित्यांचे  जेष्ठ पुत्र  थोरले संभाजीराजे महाराज.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीला चकित करून टाकणारी धडक दिली.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेसह थेट पुण्याहून थेट मुसंडी मारली ती मासूरवर नोव्हेंबर इसवी सन 1656 पुर्वी  हे मासूर ठिकाण कर्नाटक च्या धारवाड जिल्ह्याच्या दक्षिण हद्दीवर वसलेले आहे.आदिलशाहाने लगेच मुहम्मद इख्लासला रवाना केले.भाडळीच्या रौलोजी घोरपडे यांना हि आदिलशाहने पाठवले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर शाही फौजाचालून आल्या .गुत्तलचा हनमंतगौडा मराठ्यांशी शौर्याने लढला .त्यामुळे अखेर महाराजांना माघार घ्यावी लागली या वेळी विजापूरचा मुहम्मद आदिलशाह भयंकर आजारी होता .आणि याच वेळी कर्नाटकात एक भयंकर घटना घडली .

आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू थोरले संभाजीराजे महाराज यांचा कनकगिरी च्या युद्धात अफजलखानाने विश्वासघात केला.संभाजीराजे महाराज व अफजलखान कनकगिरी च्या युद्धात वेढ्याचे काम चालवत होते.वास्तविक पाहता राजे व खान एकाच दरबारातील सरदार पण खान भोसले कुटुंबाचा अति द्वेष करी.त्याने कठीण प्रसंगी संभाजीराजे महाराजांना मदत केली नाही.

अर्थात मुद्दामच केली नाही.त्यामुळे राजेंना कनकगिरीकरांच्या विरुद्ध लढत असताना वीरमरण आले.इ.स 1656 साली थोरले संभाजीराजे महाराज कनकगिरी च्या युद्धभूमीवर धारातीर्थी पडले  जयंतीबाईराणीसाहेब विधवा झाल्या.थोरल्या संभाजीराजेंना उमाजीराजे हे पुत्र होते .आपल्या जेष्ठ बंधूच्या अश्या अकाली जाण्यानं  महाराजांना फार दुःख झाले. 

महाराजांचा जेष्ठ बंधूच्या रूपात असलेला संभाजीराजे महाराज यांचा एक भक्कम आधार नियतीने महाराजांच्या हातून हिसकावून घेतला.अफजलखानाच्या दगाबाजीचा हा नवा अनुभव पाहून आई राजमाता जिजाऊ आईसाहेबांना फार दुःख झाले त्याहून त्या पापी अफजलखानाचा संताप आला..आणि पुढे योगायोग काय असतो ते पहा छत्रपती शिवाजी महाराज आणि सकलसौभाग्य संपन्न महाराणी सईबाई साहेब यांना पुरंदरावरती पुत्ररत्न झाले.

 दिवस होता 14 मे 1657 युवराजांना आपल्या शूर काकांचे नाव ठेवण्यात आले आपले युवराज शंभूराजे आपल्या पराक्रमी शूर काकांचा वारसा घेऊनच जन्मास आले. आपल्या थोरल्या बंधूच्या स्मरणार्थ निरा नदीच्या उत्तर तीरावरील मांडकी नावाच्या गावाला महाराजांनी" संभापूर' नावाची स्वतंत्र पेठ वसवली. 

 आपल्याला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपतींची सातारा गादी तसेच   करवीर गादी (कोल्हापूर गादी) तसेच  त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजेंचे वंशज तंजावरचे राजे राजेभोसले  यांच्या बद्दल आपल्या सर्वांच्या मनात प्रचंड आदर आहे  आणि तो कायम अजरामर राहील मराठेशाहीच्या इतिहासात या राजेभोसले राजघराण्याचे योगदान अतुलनीय ,गौरवशाली ,दैदिप्यमान,शब्दांत व्यक्त न करता येणारे आहे.

 तसेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे महाराज यांचे वंशज राजेभोसले ( जिंतीकर)यांच्या बद्दल फारसे आपल्याला माहिती नाही पण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तहसील मधील जिंती या गावात थोरले संभाजी राजे महाराज यांचे वंशज राहतात परिसरात या राजघराण्याला खूप मान आहे आजही येथील समाजकारणात लोककल्याणात लोकशाही मार्गाने हे राजेभोसले घराणे आपले अमुल्य योगदान देत आहे सौ.सवितादेवीराणीसाहेब   राजेभोसले या येथून सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या आहेत आणि कार्यरत आहेत.

 करमाळ्यापासून जवळच करमाळा राशिन सिध्दटेक रस्त्यावर जिंती हे गाव आहे या गावात राजेभोसले घराण्याचा वाडा आहे आणि तिथे राजेभोसले कुटुंबिय आजही वास्तव्यास आहेत....

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची