हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची

 थोरले शाहू महाराज आणि हुक्का

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची


शहाजी राजांनी पाया भरलेल्या स्वराज्याची इमारत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली,संभाजी राजांनी प्राण पणाने लढवली,वाढवली.राजाराम राजे आणि ताराराणी यांनी सुद्धा तळहातावर गर्दन पेलत मराठी मुलुखाच राज सिहासंन अबाधित ठेवलं.मराठी मुलखात असलेले हिंदवी स्वराज्य अखंड हिंदुस्थानभर पसरवत मराठा साम्राज्याचा विस्तार केला तो शंभूपुत्र शाहू राजांनी.

या शाहू राजांच्या आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी घडल्या त्यात संपूर्ण  बालपण कैदेत गेलं.महाराणी येसूबाईंनी वाढवलेला शंभूपुत्र जेव्हा कैदेतून सुटला तेव्हा आला थेट मायभूमीत.पुन्हा एकदा मराठी ताकद वाढवत असा सुसाट सुटला की अवघ्या काही दिवसात संपूर्ण भारतभर मराठे पसरवले.जे पराक्रमी होते त्यांना संधी दिली,कर्तृत्वाने होते त्यांना नेतृत्व दिलं.आणि पाहता पाहता स्वराज्याच साम्राज्य निर्माण झालं.पूर्व पश्चिम १३०००कि.मी दक्षिण उत्तर १७००० कि.मी चा प्रदेश मराठी भीमठडी घोड्यांच्या टॉपाखाली आला.

अतिशय तेजस्वी असा राजा जणू छत्रपती शिवाजी राजांची सावली म्हणून त्यांना संबोधलं जात.शाहू राजा म्हणजे इतिहासातील एक तेजस्वी पण पडद्याआड लपवले गेलेलं रत्न.पण इतिहासाने सर्वात जास्त अन्याय केलेला हा राजा आम्हाला कोणी सांगितला नाही,सांगितला तो असा की ते व्यसनी होते,आरामात राहायचे,ऐश्वर्यात लोळायचे पण त्यांचे नेतृत्व,राजकारणावरील पकड,करारी बाणा, त्यांचं मृदू हृदय आणि अजातशत्रू असूनही ४२ वर्ष साम्राज्य सांभाळणारा महान विचारांचा राजा आम्हाला सांगितला नाही..


◆ हुक्का बद्दल चा गैरसमज.......


 त्यांच्या चारित्रावरील एक काळा डाग चित्रकारांनी लावला तो म्हणजे त्यांच्या चित्रात हुक्का दाखवला जातो.पाहणाऱ्याला वाटावं की शाहू राजे हुक्क्याचे व्यसनी होते.पण सत्य काही वेगळंच होत.

       शालिवाहन शके १६४४ म्हणजे शके १७२४ च्या आसपास शाहू राजे हुक्का ओढत न्हवते.परंतु १८ वर्ष कैदेत असल्याने आणि बालपण ते तरुणपण ही जडणघडण मोगली छावणीत झाली.शिवाय शाहू राजे हे मोगलांचे मनसबदार होते, त्यांना 'राजा' किताब होता.त्यामुळे मोगली छावणीत ज्या प्रमाणे इतर राजपूत,मोगल मनसबदारांची अदब होती.त्यांच्या सवयी होत्या,त्यासाठी मोगली सरकारातुन त्यांना त्याचा भत्ता मिळायचा. त्यामुळे सर्वच लोक आपाआपले छंद जोपासायचे.


      मोगली राज्यकर्त्यांमध्ये हुक्का ओढायची प्रथा होती,जी आजही काही लोक अमलात आणतात.हुक्क्यासाठी मोगली दरबारात हुक्के बारदार नावाचा एक हुजऱ्या असायचा.जो हुक्का तयार करून ठेवायचा.त्याचा धनी कुठंही जाईल तिकडं तो हुक्का,त्याच्या साठी कोळसा आणि त्यात टाकायला जो पदार्थ वापरतात ते घेऊन सोबत असायचा.शाहू राजांना सुद्धा इतर मनसबदारांप्रमाणे हुक्क्यासाठी सरकार खर्च द्यायचं त्यामुळे त्यांनी पण एक हुक्केबार दार ठेवला होता.

       शेडगावकर भोसल्यांच्या बखरी नुसार शाहू राजांनी सोबत हुक्का ठेवला होता.परंतु ते हुक्का ओढत नसायचे.शाहूंचा हुक्केबारदार मेगोजी शाहूची स्वारी सोबत जाईल तिकडे हुक्क्यासाठी लागणारे विस्तव,शेगडी आणि इतर सामान घेउन जायचा.खरतर हुक्का हे त्या काळी एक प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचे त्यात शाहू राजे यांची जडण घडण मुगली छावणीत झाल्याने ते पण त्यांच्या प्रथेनुसार हुक्का सोबत ठेवायचे.

     १७२४ नंतर काही दरबारी लोकांच्या ही गोष्ट लक्षात आली की राजे तर हुक्का ओढत नाहीत.मेगोजी हुक्का पेटवतो राजे त्याची नळी हातात घेतात,तोंडाला लावतात आणि तो बाजूला ठेवला जातो.त्यामुळे हुक्क्याची खर्च विनाकारण होतोय.त्यामुळे हुक्का बंद केला पाहिजे असा अर्ज दरबारातील लोकांनी केला.

        शाहू राजे हे अतिशय प्रेमळ होते.जर हुक्का बंद केला तर हुक्के बारदार मेगोजी याला काही काम राहणार नाही.त्यामुळे शाहू राजांनी त्या मेगोजी ला मौजे आनवाडी इथं एक चाहुर जमीन वंशपरंपरागत करून दिली.

शाहू राजे हुक्का ओढीत असल्याची चित्रे काही लोकांनी काढली आहेत पण शाहू राजांचा हुक्का ही फक्त प्रतिष्ठेची गोष्ट होती म्हणून सोबत असायचा.शाहू राजे जर हुक्क्याच्या व्यसनी गेले असते तर ओरंगजेबानी नशेतच त्यांचं धर्मांतर केलं असत.

शाहू राजे अखंड सावधान असायचे त्यामुळे  त्यांनी कधीच स्वतःचा तोल ढासळून दिला नाही हे मात्र १०० टक्के खरं आहे...!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

रायगड किल्ल्या चे बांधकाममंत्री मुख्य अभियंता हिरोजी इंदलकर

मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदर किल्ला