The third eye of Bahirji Naik Shivaji Maharaj, the spy chief of Swarajya स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा
स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा १०-१० दिसव अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…! धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…! शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो.. मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…! खर सांगतो गड्यानो हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..! आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…! गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास होता की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…! पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक…!