Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली...


।। इ.स. १६७९ ला आदिलशाही उमराव सिद्धी मसुदखानाने छत्रपती शिवाजी महाराजांची अर्जावे, विनंती करुन, महाराजांना पायघड्या घालून मोगलां पासुन आदिलशाही वाचवण्यासाठी विनंती केली. आणि शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली. ।। 


           मसुदखान व मोगली सरदार दिलेरखान हे दोघे मिळून इ.स. १६७९  शिवाजी महाराजांवर चालु आले होते. सिद्धी मसुदखानाने सर्जाखानाला शिवाजी महाराजांवर चालुन जाण्यास फर्मावले पण तो त्याच्या आज्ञेत वागेना...

 ठरलेल्या तहानुसार सिद्धी मसुदखान वागत नाही हे पाहून दिलेरखान विलक्षण चिडला. तर इकडे सर्जाखान आज्ञेत वागत नाही या मुळे सिद्धी मसुदखान चांगलाच कोंडीत सापडला होता. आता मात्र दिलेरखान विजापुरवर चालुन जाण्यास निघाला.. 

चंचल व दगाबाज स्वभावाचा मसुदखान चांगलाच अडचणीत आला. मोगलांची समजून काढण्यासाठी शिकंदर आदिलशहा ची बहिण हिचे लग्न औरंगजेबाच्या मुलासोबत लावून देण्यास मसुदखान तयार झाला. त्या नुसार तिला १ जुलै १६७९ रोजी दिल्लीला रवाना केले..

 तरीही सिद्धी मसुदखानाच्या गळ्या भोवतीचा फास काय सैल झाला नाही तो दिलेरखानानाने अधिकच आवळला. मोगलांचा अंतस्थ हेतू विजापूर बळकावणे हाच असल्याने दिलेरखानाने पुन्हा मागणी केली की, मसाऊदने विजापूर हकीम शमसुद्दीनच्या ताब्यात देऊन टाकावे,  मसाऊदखान या गोष्टीला राजी होईना..

 दरम्यान दिलेरखानाने द्रव्याचा प्रयोग करून विजापूरकरांचे भले भले सरदार व सर्जाखानासही फोडून आपल्या झेंड्याखाली आणले विजापुरात उरली ती फक्त 'भुकेलेली, अन्नाविना फाके पडत असलेली ३-४ हजार माणसे. विजापूर आपल्या ताब्यात आलेच असे समजून दिलेरखानाने मोठ्या उत्साहाने दि. १८ ऑगस्ट १६७९ रोजी भीमा ओलांडली.

 लगेच सप्टेबरमध्ये त्याने मंगळवेढे जिंकून घेतले. नाइलाजास्तव मसाऊदखानाने विजापूरचे रक्षण करण्यासाठी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची विनवणी केली. महाराजांनी विजापूरचे संकट लक्षात घेऊन मसाऊदशी बोलणी करण्यासाठी "शके १६०० भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दि. २६ सप्टें. १६७९ रोजी श्यामजी नाईक यांना रवाना केले."


         मसुऊदने बिजापूरला लढाईचे सामान व शिवदी भरून तो किल्ला मजबूत केला. तोरगल, अदोनी, कर्नूल व पामनाईक यांच्याकडील फौजाही विजापूरात दाखल झाल्या शिवाजी महाराजांचे वकीलही विजापुरात पोहोचले. महाराजांनी मसाउदला संपूर्ण आधार देऊन विजापूरचे संरक्षण करण्याचे वचन दिले.. 

पाठोपाठ महाराजांकडून दहा हजार स्वार विजापूरला येऊन थडकले. एवढेच नाही तर, जागोजागच्या किल्ल्यावरून ओझ्याचे २००० बैल, किरकोळ सामान व रसद विजापूरकडे रवाना केली. 

आपल्या वतीने विसाजी निळकंठरावांना महाराजांनी विजापूरला पाठवून मसाऊदखानाला सर्वतोपरी धीर दिला. आपण स्वत:ही जातीने मदतीसाठी प्रसंगी विजापूरला येऊ असाही महाराजांनी निरोप कळविला.

 रामनवमीला दोड्डा बाळापूर काबीज करून आनंदराव आपल्या २००० ते ३००० हजार घोडदळासह महाराजांच्या सांगण्या वरुन  विजापूरला मसुदच्या मदतीसाठी आले. त्यावेळी खासा मसुदखान त्यांना सामोरा गेला..

 कुत्बशाहानेही महाराजांमार्फत धनाचा पुरवठा करून विजापूरकरांची बाजू सुदृढ केली. मोगलांविरुद्ध अवघी दक्षिण एक झाली. आणि कुठल्याही परिस्थितीत विजापूर गिळंकृत करावयाचेच असा निर्धार करून दिलेरखानाने विजापूरच्या रोखाने कूच केले..

 दिलेरखान विजापूर भोवतीचा गळफास पक्का आवळण्यासाठी निघाला तत्पूर्वी मोरोपंत पेशयांसह खासे महाराज बिजापूरजवळ जाऊन पोहोचले. विजापूरकरांचा वकिल व  महाराजांची तिकडील १०००० फौज घेऊन आनंदराव महाराजांना सामोरे आले.. 

यावेळी ५००० औज घेऊन विजापूरला जावे व शिकंदर आदिलशाहाची भेट घ्यावी असा महाराजांचा विचार होता, पण संशयी मसाऊदखानाने फक्त ५०० लोकांसह महाराजांना बिजापूर प्रवेशाची परवानगी दिली.. 

महाराज कुत्बशाहाप्रमाणेच शिकंदर आदिलशाहाला भेटू चाहत होते. ते ५०० स्वारांसह जाण्यासही तयार झाले, परंतु मोरोपंत पेशवे यांनी तसे न करण्याची महाराजांना विनंती केली. मसाऊदखानाचा काहीच भरवसा नव्हता. 

शिवाय महाराजांनी बिजापूरकरांचा बराच प्रदेश जिंकून घेतल्याने तो आतून चिडलेलाही होता त्यामुळे अकारण धोका पत्करण्यात अर्थ नाही असे पंतांचे मत होते महाराजांना पंतांचा सल्ला पटला व त्यांनी विजापूरकरांच्या वकिलासोबत मसाऊदखानाला निरोप पाठविला की 'पादशाहाची भेट घेणे मजला मनापासून संतोष आहे..

 परंतु आधी मोगलासी लढाई करून रिकामा होईन. दिलेरखानास काढून लावल्यावर मग भेटेन. या वेळेस दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांनी मोगलांचे आदिलशाहीवरील संकट परतावून लावले होते. दिलेरखान परत फिरला...

 एरवी स्वराज्यावर चालुन एणारे आदिलशहा उमराव आज शिवाजी महाराजांची कृपा दृष्टी होऊन आदिलशाही वाचावी म्हणून महाराजांना अर्जावे विनंती करुन पायघड्या घालत होते. आदिलशाहीवरील संकट दूर झाल्यावर महाराज तेथून जालनापुरच्या मोहिमेवर रवाना झाले.  आदिलशाही मोगलां पासून वाचावणे हे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी गरजेचे होते.

 जर आदिलशाही दिलेरखान गिळंकृत करतोय तर मोगलांचा सरळ सरळ शेजार हा स्वराज्याला झाला असता. एकमेकांच्या सिमा भिडल्या असत्या. व मोगली आक्रमण हे स्वराज्यावर झाले असते. मोगलांच्या आक्रमणाचा त्रास स्वराज्याला होऊ नये म्हणून आदिलशाही वाचवणे क्रमप्राप्त होते...

 छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान, महानिर्वाण १६८० झाल्यावर काहि वर्षानंतर मोगल बादशहा औरंगजेब दक्षिणेत आला. तेव्हा आदिलशाही चा अडसर मध्ये आला होता. हा दूरदर्शी कावा महाराजांनी अगोदरच ओळखला होता....

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची