Chatrapati shivaji maharaj afjal khan encounter vadh छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान चा काढला बाहेर कोथळा


छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान चा काढला बाहेर कोथळा ...!!!


 त्या वेळेस स्वराज्य फार काही मोठं नव्हतं. आदिलशहा चे एकेक सरदार महाराजांकडून मारले जात होते. आदिलशहाच्या दरबारात भय होते, शिवबाचा काटा काढण्यासाठी बडी बेगम ने विजापूर दरबार भरवला आणि विचारले आहे का कोणी तयार त्या शिवा शी लढायला ? दरबारात शांतता पसरली...!!

◆ अफझलखान ने विडा उचलला...!!

 तेवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार उठला आणि म्हणाला मी पकडून आणतो त्या शिवा ला, जातो कुठे तो, जिवंत किंवा मृत. त्याचे नाव अफजल खान होते. 

अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्ती ची तोड फोड करत आला. 

शिवाजीं महाराजांनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला.

 अफजल खाना ने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला.


खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. महाराजांनी त्याला गडावर भेटीचे निमंत्रण दिले.  १० नोव्हेंबर १६५९ ,सकाळी ११ वाजता भेटीची वेळ ठरली. 

गडावरून निघताना राजांनी स्वतःकडे एक तलवार, कट्यार आणि वाघनखे ठेवली होती. खानाकडे देखील एक तलवार आणि कट्यार होती. 

राजांना बघतच तो म्हणाला.'मी तुला प्रत्यक्ष सर्व शक्तिशाली विजापूर दरबारात घेऊन जाऊन आदिलशहासमोर हजर करतो. घाबरू नकोस.

 हात मिळवणी कर आणि मला आलिंगन दे.' असे म्हणून त्याने राजांना मगरमिठीत घेतले. उंचीला जास्त असणाऱ्या खानाने राजांचे डोके दाबून तो आता पाठीवर कट्यारीने वार करणार तेवढ्यात राजांनी एका क्षणात आपली मान त्या मगरमिठीतून सोडवून घेऊन वाघनखे खानच्या पोटात खुपसली. 

काही अंतरावर उभे असणाऱ्या अंगरक्षक आणि कृष्णाजी भास्कर यांनाच नव्हे तर खुद्द खानाला देखील अनपेक्षित असा हा हल्ला असणार. पापणी लावण्यास वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात राजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला होता. 

तेवढ्यात बडा सय्यद धावून आला, राजांवर वार करण्यासाठी उचलेला त्याचा हात जिवा महालाने खांद्यापासून वेगळा केला. हीच संधी साधून आपली आतडी दोन्ही हातात पकडून खान पालखीकडे धावला, भोई पालखी घेऊन पळू लागले, 

पण संभाजी कावजी ने सगळ्या भोईंचे पाय तोडून टाकले, पुढच्या काही क्षणात संभाजी कावजीने खानाचे मुंकडे धडावेगळे केले...

इकडे शामियानात कृष्णाजी भास्कर राज्यांवर चाल करून आला, राजांनी तलवारीने त्याचे शीर धडावेगळे केले आणि खानाचे सर्व अंगरक्षक तिथल्या तिथे कापले गेले. राजे पंताजी आणि अंगरक्षक घेऊन गडाकडे त्वरित रवाना झाले ..!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

The second time Surat was looted, Shivaji Maharaj cut off Aurangzeb's nose दुसऱ्यादा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी औरंगजेब चे नाक कापले

Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

मुरारबाजी देशपांडे आणि पुरंदर किल्ला