Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

           १५ जाने. १६५६ ला जावळी स्वराज्यात आली, शिवाजी महाराजांनी ३० मार्च १६५६ पर्यंत जावळीत मुक्काम करुन जावळीची सर्व व्यवस्था लावली. सैन्य भरती केली रायगड किल्ल्याचे दुरुस्तीचे काम हि चालु झाले...

 राजगड बांधणीचे काम पुर्वी सुरूच होते. असे सर्व सुरळीत असता सुप्याचे प्रकरण महाराजांसमोर उद्भवले. सुपे परगाण्याची सरहवालदारी शहाजी राजेंनी, संभाजी मोहिते मामांकडे सोपवली होती. ते शहाजीराजेंच्या द्वितीय पत्नी तुकाबाईसाहेब यांचे बंधु होते... 

म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र मामा. संभाजी मोहिते मामांच्या या लाचखोरीच्या कागाळ्या शिवाजी महाराजांच्या कानावर अगोदर येतच होत्या. पण आता प्रकरण भलतेच झाले होते. वरती नमुद केल्या प्रमाणे जावळी १५ जाने. १६५६ स्वराज्यात आली होती..

 त्या मुळे आदिलशाही आक्रमक स्वराज्यावर होणार हे नक्कीच होते. अन ते स्वराज्याच्या पूर्वेकडून होणार हे नक्कीच. अन हा सुपे परगाना स्वराज्याच्या पुर्वेला होता..

 संभाजी मोहित्यास या ठिकाणी ठेवणे हे किती धोकादायक होते हे महाराजांनी उमगले व संभाजी मोहिते मामास पत्र पाठवले व सुप्याहुन कुल पागा घेऊन पुण्यास मुक्कामी येणे. पण पत्र घेऊन आलेल्या हरकऱ्यास उर्मट सवाल जवाब केला.'शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत..

 हुकुम करितात आणि राज्यात पुंडाबे करून ठाणी बसवितात हे राजांच्या प्रतिष्ठेवरी निभावले होते. याऊपरी फैल पुंडावा) केला तरी राजांची शोभा राहणार नाही आणि हेही प्राणेकरून वाचणार नाहीत. काही आपले पायाकडे पाहून करावे! म्हणजे मामांनी भाच्यालाच 'प्रौढ' उपदेश केला ! या संभाजी मोहित्याच्या कलागती या शिवाजी महाराजांकडे व महाराजा शहाजीराजे यांच्या कडे पोचतच होत्या.   

       संभाजी मोहिते मामानी सुप्याच्याच देश कुलकर्णी ला २५ होन कर्जाऊ दिले ते व्याजासहित २७ होन परत मिळाल्यानंतरही मिळाले नाहीत असे खोटेच सांगून तगादा लावता पुन्हा वसुली केली...

 हे प्रकरण शहाजीराजेंकडे गेले होतेच. पुणे परगाण्याचा हवालदार असलेल्या नारी सुंदराशी कटकट करून मामा त्याच्याशी चाकडेपणाने वागू लागले होते.. 

शहाजीराजांच्या कानावर या कागाळ्या जाऊ लागल्या तेव्हा त्यांनी मामांच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करणारे एक पत्रही पाठविले, पण मामांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.. 

तिमाजी खंडेरावाचे प्रकरण मामांच्या अमानुष कारभारावर प्रकाश टाकणारे आहे.तिमाजी खंडेराव सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळे येथील वयोवृद्ध कुळकर्णी होता..

 त्याने ३०-३५ वर्षापूर्वी दुष्काळात रखमाजी व अंताजी उंडे पणदरकर यांची मौजे कोल्हाळे येथील कुलकर्ण व ज्योतिषवृत्ती २० होनात विकत घेतली होती..

 दुष्काळामुळे उंडे बंधू सुजून अन्नाविना मरणासन्न झाले होते. त्यामुळे तेथील पाटील लुखोजी खोमणा याच्या सल्ल्यावरून त्यांनी जीव वाचविण्यासाठी एक गावाची वृत्ती तिमाजीस स्वेच्छापूर्वक विकली. ३०-३५ वर्षे सुरळीत चालले.. 

आता उंडे बंधू मृत्यू पावल्यावर रखमाजी उंडेचे दोन पुत्र विसाजी व रामाजी इसवी सन १६५५ साली संभाजी मोहिते मामांकडे आले. त्यांना १ घोडी व ४५ होन (म्हणजे १७४ = रु. म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर रुपये सहा आणे) लाच देऊन विसाजी व रामाजींनी आपल्या वडिलांचे ३०-३५ वर्षांपूर्वीचे मौजे कोल्हाळे येथील वतन तिमाजीकडून परत आपल्याला मिळवून देण्याची गळ घातली...

 मामांनी लाच घेऊन लगेच त्यांनी तिमाजी खंडेराव या वृद्ध कुळकर्ण्यास सुप्याच्या ठाण्यावर बोलावून वतन उंड्यांच्या नावे लिहून देण्यास धमकावले..

 त्याने नकार देताच मामांनी त्याला कैदे केले. कैदेत तो म्हाताऱ्या तिमाजीस फोडून काढू लागला. व वीस होन जबरीने त्याच्या देऊन वतन रामाजी व विसाजीच्या नावे केले..

 तिमाजी कर्नाटकात बेनकाले गावी शहाजी राजांकडे गेला. त्यावरून शहाजी राजेंनी ७ डिसेंबर १६५५ रोजी विठोजी नाईक देशमुख व बाबाजी राम कुलकर्णी यांच्या कडे पत्र पाठवून तिमाजीचा निवाडा गोतसभेत करून तिमाजीला न्याय द्यावा असे पत्र तिमाजीच्या हाती दिले...

 इकडे शिवाजी महाराजांनी संभाजी मोहित्यास शके १५७८ आश्विन वद्य १, म्हणजे २४ सप्टें. १६५६ रोजी कैद केले. व गढितील बरेच द्रव्य, पागेतील ३०० घोडी, कापडचोपड व वस्तु सर्व जप्त केले. अन संभाजी मोहित्याची कैदेतून रवानगी कर्नाटकात शहाजी राजांकडे केली... 

इकडे तिमाजी मोहिते मामा कैद झाल्याची वार्ता कळाली. तो शिवाजी महाराजांकडे ते पत्र घेऊन गेला. त्यानुसार महाराजांनी तो निवाडा गोतसभेत उभा केला..

 व तिमाजीस न्याय दिला. संभाजी मोहिते मामास शास्त केले यावरुन स्वराज्यात चांगलीच जरब बसली...

 स्वराज्यात नात्यागोत्याला थारा नाही, जो गैर करेल त्यास शास्त हे होणारच असा स्वराज्याचा दंडक सर्व दुर पसरला...

 तर महाराजांनी नात्याचा ही विचार केला नाही. मामास हि गैरकृत्य दाखल कैद करुन सर्व मालमत्ता जप्त केली..!!

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned


15 Jan.  Jawali came under Swarajya in 1656, Shivaji Maharaj stayed in Jawali till March 30, 1656 and made all arrangements for Jawali.  Army recruited and repair work of Raigad fort started ...

 Rajgad construction work was going on earlier.  While all this was going on, the case of Supya came before Maharaj.  Shahaji Raje had handed over the charge of Supe Pargana to Sambhaji Mohite Mama.  He was the brother of Shahaji Raje's second wife Tukabaisaheb ...

 That is Shivaji Maharaj's step mama.  Sambhaji Mohite's uncle's bribery papers were already coming to Shivaji Maharaj's ears.  But now things got better.  Jawali 15 Jan as mentioned above.  She came to Swarajya in 1656.

 Due to that, Adilshahi was going to attack aggressively.  And it will definitely happen from the east of Swarajya.  Ann Ha Supe Pargana was east of Swarajya ..

Maharaj realized how dangerous it was to keep Sambhaji Mohite in this place.  But he answered the rude question to the person who brought the letter.

 It was a matter of prestige of the kings to issue orders and establish police stations in the state.  Even if it spreads like this, the kings will not be beautiful and they will not survive.  Something to do with your feet!  I mean, uncle preached 'adult' to niece!  The art of this Sambhaji Mohita was reaching Shivaji Maharaj and Maharaja Shahaji Raje.

 Sambhaji Mohite gave a loan of 25 hons to Mama Supya's country Kulkarni.

 This case had gone to Shahaji Raje.  Mama had started quarreling with Nari Sundara, a constable of Pune Pargana.

 When these papers started reaching Shahaji Raja's ears, he also sent a letter expressing his displeasure about his uncle's conduct, but his uncle's behavior did not improve...

Timaji Khanderao's case sheds light on his uncle's inhuman treatment. Timaji Khanderao was an elderly Kulkarni from Mauje Kolhale in Supe Pargana.

 He had bought Rakhmaji and Antaji Unde Pandarkar's Mauje from Kolhale and Jyotishvritti in Kolhale for 20 hons 30-35 years ago.

 Due to the drought, the fields didn't produce much produce this year.  Therefore, on the advice of Patil Lukhoji Khomana, he voluntarily sold a village attitude to Timaji to save his life.  30-35 years went smoothly ..

 Now after the death of Unde brother, Rakhmaji Unde's two sons Visaji and Ramaji came to Sambhaji Mohite Mama in 1655 AD.  By bribing them with 1 horse and 45 hon (meaning 174 = Rs.

 Uncle took the bribe and immediately called Timaji Khanderao, an old man from Kulkarni, to Supya's station and threatened to write the names of Vatan Undis...

When he refused, his uncle imprisoned him.  In captivity, he began to break old Timaji.  And twenty hon Jabri gave it to Vatan in the name of Ramaji and Visaji ..

 Timaji went to Shahaji Raja in Benkale village in Karnataka.  On that, Shahaji Raje sent a letter to Vithoji Naik Deshmukh and Babaji Ram Kulkarni on December 7, 1655, handing over a letter to Timaji asking him to give justice to Timaji.

 Here Shivaji Maharaj gave Sambhaji Mohit to Shake 1578 Ashwin Vadya 1, i.e. 24 Sept.  Captured on 1656.  And confiscated much of the fort's wreckage, 300 horses, clothing, and paraphernalia.  Un Sambhaji Mohita was released from captivity to Shahaji Raja in Karnataka ...

 Here I heard the news that Timaji Mohite Mama was imprisoned.  He took the letter to Shivaji Maharaj.  Accordingly, the Maharaja raised the issue in the Gotasabha.

 And gave justice to Timaji.  Sambhaji Mohite Mamas was punished and a good deal was done in Swarajya ...

 In Swarajya, there is no place for nepotism.

 So Maharaj did not think of this relationship.  Mamas was arrested for misconduct and all his property was confiscated .. !!



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

हिंदनृपती गाथा छत्रपती संभाजी पुत्राची