पोस्ट्स

The third eye of Bahirji Naik Shivaji Maharaj, the spy chief of Swarajya स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा

इमेज
स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा १०-१० दिसव अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…! धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!तलवार,भाला,फरीगगदा,पट्टा, विटटा,धनुष्य,असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा…! शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो,तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो.. मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय,सावध नियोजन आणि स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड…! खर सांगतो गड्यानो  हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता..! आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक…! गड्यानो,महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास होता की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास…! पाची पातशाहिना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक…!

Shivaji Maharaj saved Adilshahi शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली

इमेज
शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली... ।। इ.स. १६७९ ला आदिलशाही उमराव सिद्धी मसुदखानाने छत्रपती शिवाजी महाराजांची अर्जावे, विनंती करुन, महाराजांना पायघड्या घालून मोगलां पासुन आदिलशाही वाचवण्यासाठी विनंती केली. आणि शिवाजी महाराजांनी आदिलशाही वाचवली. ।।             मसुदखान व मोगली सरदार दिलेरखान हे दोघे मिळून इ.स. १६७९  शिवाजी महाराजांवर चालु आले होते. सिद्धी मसुदखानाने सर्जाखानाला शिवाजी महाराजांवर चालुन जाण्यास फर्मावले पण तो त्याच्या आज्ञेत वागेना...  ठरलेल्या तहानुसार सिद्धी मसुदखान वागत नाही हे पाहून दिलेरखान विलक्षण चिडला. तर इकडे सर्जाखान आज्ञेत वागत नाही या मुळे सिद्धी मसुदखान चांगलाच कोंडीत सापडला होता. आता मात्र दिलेरखान विजापुरवर चालुन जाण्यास निघाला..  चंचल व दगाबाज स्वभावाचा मसुदखान चांगलाच अडचणीत आला. मोगलांची समजून काढण्यासाठी शिकंदर आदिलशहा ची बहिण हिचे लग्न औरंगजेबाच्या मुलासोबत लावून देण्यास मसुदखान तयार झाला. त्या नुसार तिला १ जुलै १६७९ रोजी दिल्लीला रवाना केले..   तरीही सिद्धी मसुदखानाच्या गळ्या भोवतीचा फास काय सैल झाला नाही तो दिलेरखानानाने अधिकच आवळला. मोगलांचा अंतस्थ

Mama Sambhaji Mohite, a bribe taker who took action against Swarajya, was imprisoned स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद

इमेज
स्वराज्य विरोधात कारवाई करणाऱ्या लाचखोर मामा संभाजी मोहिते ला केले कैद            १५ जाने. १६५६ ला जावळी स्वराज्यात आली , शिवाजी महाराजांनी ३० मार्च १६५६ पर्यंत जावळीत मुक्काम करुन जावळीची सर्व व्यवस्था लावली. सैन्य भरती केली रायगड किल्ल्याचे दुरुस्तीचे काम हि चालु झाले...  राजगड बांधणीचे काम पुर्वी सुरूच होते. असे सर्व सुरळीत असता सुप्याचे प्रकरण महाराजांसमोर उद्भवले. सुपे परगाण्याची सरहवालदारी शहाजी राजेंनी, संभाजी मोहिते मामांकडे सोपवली होती. ते शहाजीराजेंच्या द्वितीय पत्नी तुकाबाईसाहेब यांचे बंधु होते...  म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र मामा. संभाजी मोहिते मामांच्या या लाचखोरीच्या कागाळ्या शिवाजी महाराजांच्या कानावर अगोदर येतच होत्या. पण आता प्रकरण भलतेच झाले होते. वरती नमुद केल्या प्रमाणे जावळी १५ जाने. १६५६ स्वराज्यात आली होती..  त्या मुळे आदिलशाही आक्रमक स्वराज्यावर होणार हे नक्कीच होते. अन ते स्वराज्याच्या पूर्वेकडून होणार हे नक्कीच. अन हा सुपे परगाना स्वराज्याच्या पुर्वेला होता..  संभाजी मोहित्यास या ठिकाणी ठेवणे हे किती धोकादायक होते हे महाराजांनी उमगले व संभाजी मोहिते मामास

Naldurg Nal Damayanti fort of Jal Mahal in Osmanabad district उस्मानाबाद जिल्ह्यातील जल महाल चा किल्ला नळदुर्ग नळ दमयंती..

इमेज
उस्मानाबाद जिल्ह्यातील जल महाल चा किल्ला नळदुर्ग नळ दमयंती..    जल महल हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येत ते निळाशार पाणी, त्या अथांग पाण्यात सुंदर असा महाल आणि नैसर्गिक सुंदरता डोळे,  दिपुन जावं अस काहीसं पण आजच्या आधुनिक युगात बांधलेली धरणे सहज फुटून जातात  त्यामुळं जीवहानी आणि कितीतरी नुकसान होते पण जेव्हा या एडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हत्या तेव्हा मात्र आमच्या पूर्वजांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर जे काही निर्माण केलं ते बहुदा आधुनी तंत्रज्ञानाला सुद्धा साध्य होणार नाही         आज आपण अश्याच एका भुईकोटाची माहीत घेणार आहोत खरं तर त्याच्या नावातच किल्ल्याच सर्व सार  काही  येत उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग हा भुईकोटांच्या विश्वातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा किल्ला, नावा प्रमाणेच नल आणि दमयंती च्या कथेचा सार त्यात जाणवतो.. किल्ल्याची रचना फार सुरेख, किल्ल्याच्या आता प्रवेश करतांना गोमुखी पद्धतिचे रचना असणारे दरवाजे लागतात मुख्य दरवाज्यावर खूप सुंदर कोरीव काम आढळते..  पहिले दोन दरवाजे पार केल्यानंतर नागमोडी वळण घेऊन किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो या रस्त्याने जातांना किल्ल्याच

Father of indian navy Shivaji Maharaj's ship armor construction and vision शिवाजी महाराजांचे जहाज आरमाराची बांधणी व दूरदृष्टी

इमेज
Father of indian navy Shivaji Maharaj's ship armor construction and vision  शिवाजी महाराजांचे जहाज  महाराजांचे ( जहाज ) आरमाराची बांधणी व दूरदृष्टी...     शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळी ताब्यात इ.स. १६५५ - १६५६  च्या सुमारास घेतली तेव्हा रायगड ही स्वराज्यात आला व तेव्हा, शिवाजी महाराजांना आरमाराची बांधणी करणे आवश्यक वाटु लागले... कारण ज्याचे आरमार त्याचा च समुद्र हे शिवाजी महाराजांचे समीकरण अगदि स्पष्ट होते. म्हणून च शिवाजी महाराजांना father of indian navy म्हटले जाते.. पोर्तुगीज दप्तरातील नोंदी प्रमाणे शिवाजी महाराजांनी १६५९ मधे मराठ्यांच्या आरमाराची मुहुर्त मेढ रोवली...  पण आरमार भक्कम कसे करावे शत्रूवर जबर कशी बसले या दृष्टीने शिवरायांनी आरमार उभारले होते. त्याचा प्रत्येय हा आरमाराच्या आज्ञापत्रात येतो, त्यातील प्रमुख बाबी खाली मांडणार आहोत.         शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराब, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार, या प्रकारची जहाजे असल्याचे कृष्णाजी अनंत सभासद सांगतो...  तसेच मल्हाराव होळकर चिटनीस म्हणजे चिटनीस बखर मधे मचवे, बाभोर, तिरकती व पाल यांची नोंद दिसते. गलबतांपेक

Chatrapati shivaji maharaj afjal khan encounter vadh छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान चा काढला बाहेर कोथळा

इमेज
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान चा काढला बाहेर कोथळा ...!!!  त्या वेळेस स्वराज्य फार काही मोठं नव्हतं. आदिलशहा चे एकेक सरदार महाराजांकडून मारले जात होते. आदिलशहाच्या दरबारात भय होते, शिवबाचा काटा काढण्यासाठी  बडी बेगम ने विजापूर दरबार भरवला आणि विचारले आहे का कोणी तयार त्या शिवा शी लढायला ? दरबारात शांतता पसरली...!! ◆ अफझलखान ने विडा उचलला...!!  तेवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार उठला आणि म्हणाला मी पकडून आणतो त्या शिवा ला, जातो कुठे तो, जिवंत किंवा मृत. त्याचे नाव अफजल खान होते.  अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्ती ची तोड फोड करत आला.  शिवाजीं महाराजांनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला.  अफजल खाना ने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानान

Mallikarjun mahadev nhavre tal shirur श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर

इमेज
श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर   सौराष्ट्र सोमनाथ ,श्री         शैले   मल्लिकार्जुनम !!   मल्लिकार्जुन महादेव हे बारा ज्योतिर्लिंग मधील दुसरे ज्योतिर्लिंग   श्री शैल्यम चा मल्लिकार्जुन महादेव म्हणून भारतभर प्रसिध्द आहे.... महादेवाचे दुसरे नाव मल्लिकार्जुन आहे... अशा मल्लिकार्जुन महादेवाच्या नावाने आनेक मंदिर महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. असच एक मल्लिकार्जुन महादेवा च मंदिर शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात आहे.  न्हावरे गावाचा महादेव म्हणजे जागृत देवस्थान . या मल्लिकार्जुन महादेवाच मंदिर हे भव्यदिव्य असून मुळ बांधणी चालुक्यशैलीतील असून वेळोवेळी त्याचा जिर्णोद्धार झालेला आहे. मंदिराच्या दरवाजावर असलेल्या शिलालेखा नुसार जोशीपारखी यांनी याचा जिर्णोद्धार केलेला समजतो. पुढे पेशवेकाळात या मंदिराच्या देवस्थानाला रिसबुड घराण्याकडून दिवाबत्ती साठी खुपसारी जमिन दान दिली होती....  रिसबुड हे सावकरी करीत होते. करडे महालाची व्यवस्थाही हे पेशवेकाळात पाहात होते... मल्लिकार्जुन च्या कावडीचा इतिहास पाहता ही कावड पाच वेळा निघते. 1) चैत्र पाडवा - आलेगाव भीमा नदी २) चैत्र एकादश