When and where did Hambirrao get the post of Commander-in-Chief. #हंबिररावांना_सरसेनापती पद केव्हा आणि कोठे मिळाले

हंबिररावांना सरसेनापती पद केव्हा आणि कोठे मिळाले..


                   हंसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव. स्वराज्याच सेनापतीपद मिळणं हे सोपं काम नाही त्या मागे भरपूर घटना घडून गेलेल्या असतात..

  ८ एप्रिल १६७४,९ एप्रिल १६७४, १८एप्रिल १६७४ या तीन तारखा आहेत त्या हंबीररावांना सेनापतिपद मिळाले म्हणून फिरतायेत .पण ९ ,१८ या दोन तारखेचा संदर्भ कोठेही आढळून येते नाही..

                    त्यात हंबिररावांचे वडील संभाजी मोहिते,आजोबा तुकोजी आणि पणजोबा रतोजी मोहिते हे त्यांच्या काळात लष्करातील मोठया हुद्यावर काम करत होते लष्करी शिक्षनाच बाळकडू हंबीररावांना घरातून मिळालं होत..


पण ते युद्ध भूमीवर दिसलं तरच त्याच फळ मिळत.. ते पुढे हंबिररावांनी त्यांच्या बुद्धी,तलवार आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिल.

८ एप्रिल १६७४ हंबीररावांना सरसेनापति पद मिळाले. 

              उंबराणी ची लढाई १५.०४.१६७३, नेसरीची लढाई २४.०४.१६७४, अफजल खान लढाई, १६६६ नंतर पुरंदर च्या तहात मध्ये गेलेले २३ किल्ले जिंकून आणण्यात केलेल्या मोहिमा आणि अशा अनेक रणांगणात शत्रूला पाणी पाजून आपल्या सहकार्या सोबत या स्वराज्याला एकेक विजय मिळवत त्यांना सरसेनापती पद मिळालं आहे ..

     काही लोकांना वाटत असेल कि हंबिरराव हे छत्रपती महाराणी सोयराबाईचे बंधू आहेत. भोसले आणि मोहिते घराण्याचे पूर्वापार चालत आलेले सोयरे ,नाते सबंध आहेत म्हणून कि काय त्यांना सरनौबत पद दिल जातय. तर तसं काहीही नाही कारण त्यांचे कर्तव्यच तितके मोठे होते..

     सेनापती प्रतापराव गुजर पडले तेव्हा हंबिरराव हे चिपळुणास लष्कराच्या छावनीत ५००० घोडेस्वार असलेल्या सैनिकांचे मुख्य सरदार होते. त्यानंतर दीड महिन्या नंतर त्यांना सरनौबत दिल गेलंय.

अस नाही कि केवळ एका नेसरीच्या लढाईत पराक्रम दाखवल्यामुळे त्यांचा  विचार करून महाराजांनी हा निर्णय घेतला .त्यामागे खूप चर्चा विनिमय करून हंबीररावांच नाव पुढे आलेलं असावं. आणि #हंबीररावांना_सरसेनापती_पद_दिले_गेले..!!

#When_and_where_did_Hambirrao_get_th_post_of_Commander-in-Chief.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट

#Chatrapati_Sarfoji_raje_bhosale #छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय )

107 Shivling installed by Lord Rama in Papanasham temple पापनाशम मंदिर में भगवान राम द्वारा स्थापित किये गए १०७ शिवलिंग

May 12, 1666 Chhatrapati Shivaji's historic visit to Agra १२ मे १६६६ छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट