#Chatrapati_Sarfoji_raje_bhosale #छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय )
#छत्रपती_सरफोजी_राजे_भोसले_दुसरे ( #सर्फोजीराजे_व्दितीय )
छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले तंजावर गादी सांभाळत होते हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांचे दहावे वंशज म्हणजे सर्फोजीराजे भोसले द्वितीय. त्यांनी १७९८ ते १८३२ या काळात गादी सांभाळली. दक्षिण भारतात त्यांनी प्रथम देवनागरी छापखाना काढला. अनेक कलांसहच त्यांना वैद्यक शास्त्राची आवड होती.
★ औषधांचे उद्यान जडीबुटी लागवड
त्यांना केवळ आवड होती असे नव्हे तर त्यांनी आयुर्वेदाचा उत्तम अभ्यास केला होता त्यावर एक संकलनात्मक ग्रंथही लिहिला होता. त्यांनी धन्वंतरी महाल उभारला, औषधी उद्यान, औषधी कोठार असे उभारले होते.
औषधी उद्यानात दुर हिमालया पासून कित्येक ठिकाणच्या महत्वपूर्ण वनस्पती गोळा केल्या होत्या. पशु आयुर्वेदावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना ही त्यांनी केली होती.
धन्वंतरी महालात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार चालत असत. हे उपचार केवळ वैद्य व डॉक्टर्स मार्फतच नव्हे तर महाराज स्वतःदेखील नेहमी करत असत. आयुर्वेद, जडीबुटी ,युनानी आणि पाश्चात्य वैद्यकाच्या सहाय्याने डोळ्यांवर उपचार करणे ही त्यांची खासियत होती.
ते मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही करत असत.त्यांच्या हस्ते शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णाला घरी सोडताना ते दोन रुपये इनाम म्हणून देत असत. या शस्त्रक्रियांत साहाय्य करण्यास डॉ. मॅकबिन नामक या इंग्रज अधिकाऱ्याची देखील नेमणुक राजेसाहेबांनी केलेली होती.
★ रुग्णांचे उपचाराचे कागदपत्रे ( केसपेपर्स )
राजेसाहेबांनी हाताळलेल्या पन्नास रुग्णांचे केसपेपर्स आणि उपचारपूर्व व नंतरची रेखाटने आजही उपलब्ध आहेत. २००४ साली काही संशोधकांनी ही सारी माहिती गोळा केली.
ज्यावर पुढे ज्योतिर्मय बिस्वास यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन पत्रक प्रकाशित केले आणि मराठ्यांच्या इतिहासातलं एक असे सुंदर सोनेरी पान जगासमोर आणले..!
===================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा