पोस्ट्स

Mallikarjun mahadev nhavre tal shirur श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर

इमेज
श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर न्हावरे गांव ता. शिरूर   सौराष्ट्र सोमनाथ ,श्री         शैले   मल्लिकार्जुनम !!   मल्लिकार्जुन महादेव हे बारा ज्योतिर्लिंग मधील दुसरे ज्योतिर्लिंग   श्री शैल्यम चा मल्लिकार्जुन महादेव म्हणून भारतभर प्रसिध्द आहे.... महादेवाचे दुसरे नाव मल्लिकार्जुन आहे... अशा मल्लिकार्जुन महादेवाच्या नावाने आनेक मंदिर महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. असच एक मल्लिकार्जुन महादेवा च मंदिर शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात आहे.  न्हावरे गावाचा महादेव म्हणजे जागृत देवस्थान . या मल्लिकार्जुन महादेवाच मंदिर हे भव्यदिव्य असून मुळ बांधणी चालुक्यशैलीतील असून वेळोवेळी त्याचा जिर्णोद्धार झालेला आहे. मंदिराच्या दरवाजावर असलेल्या शिलालेखा नुसार जोशीपारखी यांनी याचा जिर्णोद्धार केलेला समजतो. पुढे पेशवेकाळात या मंदिराच्या देवस्थानाला रिसबुड घराण्याकडून दिवाबत्ती साठी खुपसारी जमिन दान दिली होती....  रिसबुड हे सावकरी करीत होते. करडे महालाची व्यवस्थाही हे पेशवेकाळात पाहात होते... मल्लिकार्जुन च्या कावडीचा इतिहास पाहता ही कावड पाच वेळा निघते. 1) चैत्र पाडवा - आलेगाव भीमा नदी २) चैत्र एकादश

Dwarkadhish temple pandharpur shinde द्वारकाधीश मंदिर पंढरपूर ग्वाल्हेरच्या शिंदे सिंधिया घराण्या चे

इमेज
  द्वारकाधीश मंदिर पंढरपूर ग्वाल्हेर च्या शिंदे सिंधिया घराण्याचे

bhalvani gadhi ashti beed भाळवणी ता आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी

इमेज
भाळवणी आष्टी बीड येथील राजे निंबाळकर यांची गढी   फलटणकर मुधोजी निंबाळकर यांचें जेष्ठ पुत्र राजे जगदेवराव यांचें वंशज राजे सुलतान राव राजे निंबाळकर यांची गढी तसेच महाराष्ट्राचे आदर्श माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री कै. श्री  विलासरावजी देशमुख यांच्या  मामाचा गढीचा वाडा‌‌ होय.... हा गढीचा वाडा खूपच मजबूत आणि सुंदर असून बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या गढीचा एक बुरुज जंग्या युक्त, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मजबूत असून खूपच सुंदर आहे. गढीला तीन प्रवेशद्वार असून खूपच मजबूत आणि सुंदर आहेत ‌. एका प्रवेशद्वाराला पुरातन आणि मजबूत असा लाकडी दरवाजा आहे ‌.  ◆ गढी मध्ये पाण्याचा आड  ( विहीर )... गढी मधे एक पाण्याचा आड ( विहीर) असून संपूर्ण विट बांधकाम असलेली माझ्या पाहाण्यात आलेली पहिली विहीर आहे.  गढीच्या आतील उघड खांबी माळवदाच्या बैठक व्यवस्थेच्या खांबाचे तळखडे खूपच सुंदर आणि नक्षीदार आहेत ‌.  या गढीस पुर्वी  खंदक होता असे सुलतानराव निंबाळकरांचे वंशज श्री अरुणराव निंबाळकर यांनी सांगितले आहे पण आता खंदक नामशेष झाला आहे.  या गढीच्या समोरच एक सुंदर अशी शिवपिंडी सारखी सुंदर बारव  आहे...  मित्र

बीड प्राचीन मंदिर खंडेश्वरी देवी आणि मेंढपाळ कथा

इमेज
बीड खंडेश्वरी देवी प्राचीन मंदिर मराठवाड्यातील बीड शहरात पूर्वेला टेकडीवर खंडोबा मंदिरापासून सुमारे एक किमी अंतरावर खंडेश्वरीचे प्राचीन देवालय उभे आहे.  असे म्हणतात की कालोजी नामक धनगराने हे मंदिर बांधले. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात खंडेश्वरी मातेची ख्याती असून नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. बीड शहरातील खंडोबा मंदिराच्या टेकडीच्या बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरी मातेचे प्राचीन देवालय आहे. मंदिर प्रकारात असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर खंडेश्वरीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे.  हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधले असे सांगितले जाते. खंडोबा मंदिराचे टेकडी पायथ्याचे स्थान व खंडेश्वरी नावावरून हे बाणाईचे स्थान असावे असे वाटते. या मंदिरा समोर काळोबा वीर धनगराची समाधी आहे. खंडेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात आख्यायिका सांगितली जाते. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुका मातेने वर माग म्हणून सांगितले, तेव्हा देवी तू म

छत्रपतींची श्रीराम भक्ती

इमेज
◆ छत्रपतींची श्रीराम भक्ती.... छत्रपती शिवाजी महाराज , संभाजी महाराज व राजाराम महाराज यांची प्रभू श्रीरामचंद्राप्रती अपार श्रद्धा होती. समकालीन साधनातील नोंदीनुसार छत्रपतीं शिवरायांनी रामायणाचा विद्याभ्यास केला व रामायणाचे श्रवण केले.  छत्रपती संभाजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांची स्तुती त्यांच्या बुधभूषण या ग्रंथात केली. चाफळ येथीळ रामनवमीच्या उत्सवासाठी सनदा करून दिल्या. छत्रपती राजाराम महाराजांनी श्रीरामचंद्राचा आदर्श त्यांच्या मुद्रेतून व्यक्त केला. ◆ छत्रपती शिवाजी महाराज...!! समकालीन शिवभारतातील मधील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायणाचा विद्याभ्यास केला असे वर्णन येते. “श्रृनतस्मृनतपुराणेषु भारते दण्डनीतिषु । समस्तेश्वपि शास्त्रेषु काव्ये रामायणे तथा ॥३४॥  भावार्थ :- छत्रपती शिवाजी महाराजानी श्रुती, स्मृती , पुराणें, महाभारत, राजनीती सर्व शास्त्रे रामायण यांचा विद्याभ्यास केला. संभाजी महाराजांनी केशवभट यांचा मुलगा रामचंद्र भट याला दानपत्र दिले. केशवपंडित नावाच्या ब्राम्हणाने छत्रपती शिवाजी महाराजांनसमोर प्रयोगरूप रामायण कथन केले. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संतुष्ट होऊन श

पळशिकरांचा वाडा , पळशी ता. पारनेर

इमेज
 ★  पळशिकरांचा वाडा   पळशी , ता. पारनेर   महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जी इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखली जातात. अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी. पळशी गाव हे भुईकोटातच वसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग ठरावा, इतके हे गाव टुमदार आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा व मंदिराची उभारणी केली. भुईकोटात दगड व चौकोनी विटांचे चार वाडे आहेत. सध्या यातील केवळ एकच वाडा सुस्थितीमध्ये असून पाहण्यास खुला देखील आहे. हाच पेशव्यांचे सरदार आनंदराव पळशीकर यांचा वाडा.  या वाड्यातील नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. पळशीकरांचा हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा एक अप्रतिम नमुनाच... वाड्याच्या दरवाजा तसेच चौकटीवर उत्कृष्ट कोरीवकाम केलेले आहे. म

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी मोगलांच्या कैदेतून आर्थिक अडचणी नंतर चिंचवडच्या मोरया गोसावी यांना लिहीलेले पत्र..

इमेज
    २४ एप्रिल १७०५ या दिवशी   महाराणी  येसूबाई राणीसाहेबांनी   मोघलांच्या कैदेतून  आर्थिक अडचणी नंतर   चिंचवडच्या  मोरया गोसावी यांना लिहिलेलं पत्र....   येसूबाई राणीसाहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर अत्यंत बिकट परिस्थितीत मोगलांच्या स्वाधीन झाल्या होत्या .औरंगजेबाने त्यांची खास व्यवस्था केली होती.येसूबाई राणी साहेबांच्या बरोबर कैदेत  राजघराण्यातील अनेक लोक होते.  वारंवार होणारी आक्रमणे ,छावणीतील  लवाजम्याचा खर्च, त्यात भर म्हणून कैद्यांची व्यवस्था आणि मोगलांकरीता  उत्तरे कडून येणारे अन्नधान्य, खजिना मराठे मधेच अर्ध्यापेक्षा जास्त लुटत असल्याने औरंगजेबाची आर्थिक स्थिती खालावत चालली होती .आपल्या राजधानी पासून दूर असलेल्या या मोगल बादशहाला महाराष्ट्रात आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.           औरंगजेब येसूबाई व शाहू महाराजांना सुखसोयी पोहचवत असला तरी छावणीतील इतर लोकांप्रमाणे येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे यांनाही आर्थिक गोष्टीचा सामना करावा लागत होता. यावेळी येसूबाई राणीसाहेब व शाहूराजे अहमदनगरच्या किल्ल्यात होते. दुष्काळी परिस्थितीची झळ आपल्याला लागत आहे, तेव्हा कर्ज