पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Laling fort in Dhule district धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला

इमेज
धुळे जिल्ह्यातील लळींग चा किल्ला.. इतिहास बऱ्याच काळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली या भागांकडे धावतो आहे.  या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक प्रचंड असा हा दुर्ग इथे ठाण मांडून बसलेला धुळे भागाचा संरक्षण “किल्ला लळींग” होय. महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारूकी’ एक मोठे घराणे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा किल्ला लळींग... लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील इसवी सन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली.  इसवी सन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखान कडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला.  त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीर खानचा लळींग किल्ल्या खालीच पराभव झाला.   पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता.  इसवीसन

When and where did Hambirrao get the post of Commander-in-Chief. #हंबिररावांना_सरसेनापती पद केव्हा आणि कोठे मिळाले

इमेज
हंबिररावांना सरसेनापती पद केव्हा आणि कोठे मिळाले..                     हंसाजी मोहिते म्हणजेच हंबीरराव. स्वराज्याच सेनापतीपद मिळणं हे सोपं काम नाही त्या मागे भरपूर घटना घडून गेलेल्या असतात..   ८ एप्रिल १६७४,९ एप्रिल १६७४, १८एप्रिल १६७४ या तीन तारखा आहेत त्या हंबीररावांना सेनापतिपद मिळाले म्हणून फिरतायेत .पण ९ ,१८ या दोन तारखेचा संदर्भ कोठेही आढळून येते नाही..                     त्यात हंबिररावांचे वडील संभाजी मोहिते,आजोबा तुकोजी आणि पणजोबा रतोजी मोहिते हे त्यांच्या काळात लष्करातील मोठया हुद्यावर काम करत होते लष्करी शिक्षनाच बाळकडू हंबीररावांना घरातून मिळालं होत.. पण ते युद्ध भूमीवर दिसलं तरच त्याच फळ मिळत.. ते पुढे हंबिररावांनी त्यांच्या बुद्धी,तलवार आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिल. ८ एप्रिल १६७४ हंबीररावांना सरसेनापति पद मिळाले.                उंबराणी ची लढाई १५.०४.१६७३, नेसरीची लढाई २४.०४.१६७४, अफजल खान लढाई, १६६६ नंतर पुरंदर च्या तहात मध्ये गेलेले २३ किल्ले जिंकून आणण्यात केलेल्या मोहिमा आणि अशा अनेक रणांगणात शत्रूला पाणी पाजून आपल्या सहकार्या सोबत या स्वराज्याला एकेक विजय मिळवत त्या