#samarbhoomi_umbarkhindit_kartalb_khan_cha_parabhav #समरभूमी_उंबरखिंडीत_कारतलब_खान_चा_पराभव
#समरभूमी_उंबरखिंडीत कारतलब खान चा पराभव
शिवरायांनी उंबर खिंडीत मुगल सरदार कारतलब खान याला चांगलेच झोडपले होते व तो पांढरे निशान हाती घेऊन शरन आला होता. ३०००० मुगल सैन्यानी केवळ १००० मराठा सैन्या समोर शस्त्र टाकली होती. मराठ्यांच्या समोर मुगलांनी शस्त्रे टाकली होती. ३० हजार मुगल सैन्यावर, फक्त १००० मराठा सैन्याने मिळवलेला विजय. शिवरायांनी इथे एक युद्धनीती आखली होती. कारतलब खान हा बोरघाटातुन कोकनात उतरनार होता.
हे शिवरायांना समजताच त्यांनी पेन च्या घाटाखाली सैन्याची एक तुकडीची जमवा जमव केली व ही खबर बहीर्जी नाईक म्हणजेच गुप्तहेर खात्याच्या मदतीने कारतलब खाना पर्यंत पोहचवली. इथे बहीर्जी नाईक यांची ही कामगीरी अतुलनीय आहे. बोरघाटातुन कोकनात उतरण्याचा हा त्याचा मनसुबा उकळुन पाडण्यासाठी व त्याला कुरवंडा घाटात उतरायला भाग पाडले.
कुरवंडा घाटात ३०,००० मुगल सैन्याला केवळ १००० मराठा सैन्याने गनीमी काव्याने चांगलेच झोडपुन काढले व विजय मीळवला. त्या समई महीला सरदार राय बागन या ही मोहीमेत सामील होत्या.
शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे..
कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लांडगेतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे 'तुंगारण्य'...
अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते.
वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला. खाना ची खूपच लूटमार व नुकसान झाले. नाक कापल्या गेले आणि खान पुण्यात तसाच परतला...!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा